Winter health tips: 99 टक्के लोकांना माहित नाही थंडीत किती वाजेपर्यंत ऊन घ्यावे, केव्हा मिळते व्हिटॅमिन D?

Early morning vitamin D: हिवाळा सुरु झाला आहे. थंडीचा मोसम आहे. तुम्हाला हिवाळ्यात सूर्यप्रकाशाची गरज असेल, परंतु सकाळी ऊन घेण्याची योग्य वेळ कोणती आहे हे तुम्हाला माहीत आहे का? 

Updated: Nov 20, 2022, 09:30 AM IST
Winter health tips: 99 टक्के लोकांना माहित नाही थंडीत किती वाजेपर्यंत ऊन घ्यावे, केव्हा मिळते  व्हिटॅमिन D?  title=

Best time for vitamin D from sunlight: सध्या हिवाळा सुरु आहे. थंडीच्या दिवसात तुम्ही ऊन घेण्याचा विचार करत असाल तर सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी (vitamin D) मिळण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती याची अनेकांना माहिती नसते. उन्हाळ्यात आपण जितके जास्त सूर्यप्रकाशापासून दूर पळतो तितकेच आपल्याला हिवाळ्यात ऊन जास्त घ्यावेसे वाटते. कारण यामुळे आपल्याला थंडीपासून आराम मिळतो. याशिवाय आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत, बहुतेक लोकांना हे माहित आहे की सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की हे जीवनसत्व तुम्हाला कोणत्या वेळी मिळते? तसेच जास्त वेळ सकाळच्या कोवळ्या ऊन्हात बसल्यास त्याचा फायदा होतो. चला तर जाणून घेऊ या सकाळचे ऊन कधी घ्यावे? यातून आपल्या आरोग्याला काय फायदा होईल?  

व्हिटॅमिन डी घेण्याची योग्य वेळ कोणती?  

सकाळी कोणती वेळ?

जर तुम्हाला सकाळी  व्हिटॅमिन डी (vitamin D) घ्यायचे असेल तर तुम्ही सकाळी 8 वाजता 25 ते 30 मिनिटे सूर्यप्रकाश घेऊ शकता. कारण यावेळी व्हिटॅमिन डी चांगले उपलब्ध आहे. 

संध्याकाळ कोणती वेळ?

जर तुम्हाला संध्याकाळी सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी (vitamin D) घ्यायचे असेल तर तुम्हाला हे जीवनसत्व सूर्यास्ताच्या वेळी मिळू शकते. 

सूर्यप्रकाशाचे जाणून घ्या फायदे 

व्हिटॅमिन डी

ऊन अर्थात सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवण्याचे अनेक फायदे आहेत. यातील सर्वात महत्वाचे व्हिटॅमिन डी (vitamin D) आहे. आजच्या काळात अनेक लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने त्रस्त आहेत. हे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. याशिवाय ते आपल्या शरीरालाही ऊर्जावान ठेवते. 

सूर्यप्रकाशातून UVA मिळते

सूर्यप्रकाश शरीराला UVA प्रदान करतो, ज्यामुळे आपला रक्त प्रवाह सुधारतो. याशिवाय रक्तातील ग्लुकोजची पातळीही सुधारते. 

झोपेसाठी चांगले

जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर सूर्यप्रकाश तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. कारण यामुळे तुम्हाला गाढ झोप येण्यास मदत होते. सूर्यप्रकाशात मेलाटोनिन नावाचा हार्मोन असतो, ज्यामुळे तुम्हाला गाढ झोप येते.