चुकूनही `या` रंगाची कार खरेदी करू नका, नंतर तुम्हालाच पश्चाताप करण्याची वेळ येईल
कंपन्या गाड्यांमध्ये अनेक रंगांचे पर्याय देतात. काही ग्राहक पांढऱ्या रंगाची कार निवडतात तर काही जण लाल रंगाला पसंती देतात. पण काही रंग निवडणे तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते.
Worst Car Color to Buy: आपल्या दारात चारचाकी गाडी असावी अशी काही जणांची इच्छा असते. गाडी खरेदी करण्यासाठी पैशांची तजवीज केली जाते. तसेच कधी बजेट जास्त असल्यास कर्ज घेऊन गाडी विकत घेतली जाते. गाडी विकत घेताना किंमत आणि फीचर्ससोबत रंगाबाबही आग्रही असतो. कंपन्या गाड्यांमध्ये अनेक रंगांचे पर्याय देतात. काही ग्राहक पांढऱ्या रंगाची कार निवडतात तर काही जण लाल रंगाला पसंती देतात. पण काही रंग निवडणे तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कार रंगाबद्दल सांगणार आहोत. कारप्रेमी मोठ्या प्रमाणात काळ्या रंगाची कार घेण्यास प्राधान्य देतात. पण या रंगाच्या वाहनांमध्ये अनेक समस्या दिसल्या आहेत.
1. हा रंग पटकन घाण होतो: काळ्या रंगाची कार दिसायला सुंदर असली तरी ती खूप लवकर घाण होते. या रंगावर धूळ सहज दिसते. आज गाडी धुतली असली तरी थोडे अंतर चालल्यावरच त्यावर घाण बसते. म्हणजेच, तुम्हाला गाडी पुन्हा पुन्हा स्वच्छ करावे लागेल.
2. गाडीवर स्क्रॅचेस दिसतात: गाडीवर किरकोळ ओरखडे दिसणे ही एक सामान्य बाब आहे. पण जर तुमची गाडी काळ्या रंगाची असेल तर त्रास वाढू शकतो. खरं तर, इतर रंगांच्या तुलनेत काळ्या रंगावर स्क्रॅच सहज दिसतात.
3. देखभाल खर्च वाढतो: काळी गाडी पटकन घाण होते आणि ओरखडे दिसतील. यामुळे तुमचा खर्च वाढणार आहे. यामुळे गाडी वारंवार धुवावे लागेल, तसेच तुम्हाला स्क्रॅच दुरुस्तीसाठी पैसे भरावे लागतील.
4. गाडी लवकर गरम होते: आपल्या सर्वांना माहित आहे की काळा रंग इतर रंगांपेक्षा सूर्यप्रकाश जलद शोषतो. हा नियम काळ्या रंगाच्या कारलाही लागू होतो. उन्हाळ्यात इतर गाड्यांपेक्षा जास्त गरम होईल. यामुळे तुम्हाला एसीचा अधिक वापर करावा लागणार आहे.