मुंबई : जर तुम्ही प्ले स्टोअर वरून WhatsApp डाउनलोड करून चालवण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कारण अँड्रॉइड व्हॉट्सअ‍ॅपच्या सुधारित आवृत्तीत एक नवीन Trojan सापडला आहे, ज्याचे नाव Trojan Triada आहे. हे मालवेअर पेलोड डाउनलोड करण्यास सक्षम आहे, जे वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय डिव्हाइसवर मलिशियस एक्टिविटीज करू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायबरसुरक्षा फर्म Kasperskyने या मालवेअरबद्दल माहिती दिली आहे आणि त्याच्या संशोधकांनी त्यांच्या अलीकडील अहवालात माहिती दिली आहे की, Trojan Triada ने व्हॉट्सअ‍ॅप, FMWhatsApp 16.80.0 च्या सुधारित आवृत्तीवर परिणाम केला आहे. हे अॅप्स वापरकर्त्यांना अतिरिक्त वैशिष्ट्ये प्रदान करतात जे मूळ अ‍ॅपमध्ये नसतात.



Kaspersky पुढे म्हणाले की, एडवर्टाइजिंग सॉफ्टवेयर डेवलपमेंट किट (SDK) द्वारे Trojan Triada ने  FMWhatsAppच्या नवीन आवृत्तीत प्रवेश केला आहे. ट्रोजन-संक्रमित अ‍ॅप लाँच करून, ते यूनिक डिवाइस आइडेंटिफायर्स गोळा करत आहेत. ज्यात डिव्हाइस आयडी, ग्राहक आयडी, मॅक एड्रेस  इत्यादींचा समावेश आहे. हा डेटा गोळा केल्यानंतर, तो रिमोट सर्व्हरला पाठवतो.


हा सर्व्हर नवीन उपकरणाची नोंदणी करतो आणि परत लिंक पेलोड पाठवतो. यानंतर, अ‍ॅपमध्ये उपस्थित ट्रोजन संक्रमित डिव्हाइसवर पेलोड डाउनलोड करतो आणि सामग्री डिक्रिप्ट करतो आणि ऑपरेशनसाठी लॉन्च करतो. संशोधकांनी असे अनेक मालवेअर ओळखले आहेत, जे FMWhatsApp द्वारे लोकांचा डेटा चोरण्याचे काम करत आहेत.


यामध्ये पूर्ण-स्क्रीन जाहिराती दाखवणे, बॅकग्राउंडमध्ये अदृश्य जाहिराती चालवणे आणि डिव्हाइस मालकांना त्यांच्या माहितीशिवाय सशुल्क सदस्यतांसाठी साइन अप करणे समाविष्ट आहे.


Kaspersky म्हणाले की, FMWhatsApp चे वापरकर्ते अ‍ॅपला त्यांच्या डिव्हाइसवरून एसएमएस वाचण्याची परवानगी देत असल्याने, ट्रोजन आणि त्याचे इतर मॅलिशियस मॉड्यूल्स त्याचा लाभ घेऊ शकतात. हे वापरकर्ते पेड सबस्क्रिप्शनसाठी सहजपणे साइन अप करू शकतात, प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्याला पुष्टीकरण संदेश किंवा SMS आवश्यक आहे.