मुंबई : भारत-चीन लडाख सीमा वाद चांगलाच पेटला आहे. त्यामुळे सर्व चिनी  वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या चर्चा रंगत आहेत. भारताची सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या टिकटॉकसह ५० चिनी ऍपचा वापर न  करण्याचा इशारा भारत सरकार आणि भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. यामध्ये Tik-Tok, Helo, UC Browser आणि  Zoom अशा ऍप्सचा समावेश आहे. भारतात सर्वात जास्त चायनीज ब्रँड्स आहेत. विवो, ओप्पो असे अनेक चिनी स्मार्टफोनचा भारतीय वापर करतता. परंतु बाजारात चिनी स्मार्टफोन शिवाय अनेक कंपनीचे पर्याय आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोकिया
नोकिया ही फिनलँडची कंपनी आहे. अनेक वेग-वेगळ्या किंमतींमध्ये या कंपनीचे स्मार्टफोन बाजारत उपलब्ध आहेत. नोकिया अँड्रॉयड वनचा पार्ट आहे. म्हणजेच याच्या फोनला दोन वर्षांची गॅरंटी, अपडेट्स मिळतात.


मोटोरोला
भारतात मोटोरोला स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. मोटोरोला अमेरिकन कंपनी आहे. जवळपास सर्व सेगमेंट्समध्ये स्मार्टफोन्स ऑफर करीत आहे.


आसूस
आसूस स्मार्टफोन पॉवरफूल बॅटरीसाठी प्रसिद्ध आहे. ही कंपनी तायवानची आहे. भारतात देखील या कंपनीने अनेक फोन लाँच केले आहेत.


सॅमसंग
मध्यंतरी  सर्वत्र फक्त सॅमसंग स्मार्टफोनची चर्चा असायची. सॅमसंग दक्षिण कोरियाची कंपनी आहे. सध्या या कंपनीच्या  स्मार्टफोनचे अनेक पर्याय भारतात देखील  उपलब्ध आहेत.


ऍपल
ऍपल ही कंपनी कॅलिफॉर्नियाची आहे. नुकताच ऍपलने स्वस्तातील iPhone SE लाँच केला आहे. भारतात ऍपल फोन  वापरणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे.