How To Apply Driving Licence Online : जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स घेण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. कारण  तुम्ही घरी बसून अर्ज करून ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता. आणि ते ड्रायव्हिंग लायसन्स 7 दिवसात तुमच्या घरी पोहोचेल. जाणून घेऊया या नवीन फीचरबद्दल... ()


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परवाना बनवण्याच्या नियमात बदल


चंदीगडमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्यासाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता तुम्ही घरी बसून अर्ज करू शकता. म्हणजे तुम्हाला आरटीओच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत आणि सर्व कामे घरी बसून होतील. दिल्लीत ही सुविधा आधीपासूनच आहे. इथे अनेक गोष्टी आधीच ऑनलाइन केल्या गेल्या आहेत. वाहन हस्तांतरणासाठीही आरटीओची गरज भासणार नाही.


ऑनलाइन अर्ज कसा करावा


जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवायचे असेल तर तुम्हाला आधी अधिकृत वेबसाइट (https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do) वर जावे लागेल. येथे प्रथम तुम्हाला तुमचे राज्य (तुम्ही राहता) निवडावे लागेल. म्हणजेच तुम्ही दिल्लीत राहत असाल तर दिल्लीची निवड करावी लागेल. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करा. त्यानंतर तुम्हाला एक छोटी ऑनलाइन परीक्षा द्यावी लागेल.


वाचा : तुम्ही चुकूनही 'असे' Password ठेऊ नका, अकाउंट एका सेकंदात होईल हॅक


आरटीओ कार्यालयात चाचणी होईल


ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्यापूर्वी लर्निंग लायसन्स दिला जातं. त्यासाठी आरटीओ कार्यालयात जाऊन चाचणी द्यावी लागेल. चाचणी पास झाल्यास तुमचा परवाना मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. सर्व गोष्टी केल्यानंतर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स 7 दिवसात घरी पोहोचेल.