केवळ कॉल,मेसेज आणि अलार्म असणार्या `या` मोबाईलची किंमत 26,000 रूपये !
आजकाल लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध मंडळीपर्यंत अनेकजण आज स्मार्टफोनच्या जाळ्यामध्ये अडकले आहे.
मुंबई : आजकाल लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध मंडळीपर्यंत अनेकजण आज स्मार्टफोनच्या जाळ्यामध्ये अडकले आहे.
इंटरनेट किंवा मोबाईलजवळ अगदी काही काळासाठी दूर केला तरीही अनेकजण बैचेन होतात.
फोनचं कमी करणार स्मार्टफोनचं व्यसन
अनेकजण स्मार्टफोनचा वापर टाळण्यासाठी किंवा त्याचं व्यसन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत पण बाजरात या समस्येचे उत्तर देण्यासाठीही मोबाईल आला आहे.
Light Phone 2 मोबाईल
Light Phone 2 मोबाईलमध्ये केवळ फोन, मेसेज आणि अलार्म इतकीच सोय देण्यात आली आहे. यामध्ये कॅमेरा, डाटा नसल्याने युजर्स त्याच्या प्रिय व्यक्तींसोबत अधिक चांगला वेळ व्यतित करू शकतील असा कंपनीचा दावा आहे.
किंमत फक्त 26,000 रूपये
फोनमध्ये जितकं प्रगत तंत्रज्ञान तितकी त्याची किंमत जास्त असे अनेकांना वाटत असेल पण केवळ कॉल, मेसेज आणि अलार्म असणार्या या फोनची किंमतही सुमारे 400 डॉलर्स म्हणजेच 26,000 रूपये इतकी आहे.
अत्यंत स्लिक असणार्या, स्मार्टकार्ड किंवा बॅंकेच्या डेबिट / क्रेडीट कार्डाप्रमाणे असणार्या या मोबाईलची इतकी किंमत पाहता काही ग्राहकांनी या फोनला ' डंम्प फोन' म्हणत यावर टीका केली आहे.