नवी दिल्ली : फ्री ४जी डेडा उपलब्ध झाल्याने अनेक गोष्टी सोप्या सहज झाल्या आहेत. म्हणजेच अगदी व्हाॅटस अॅप चॅट पासून लाईव्ह टीव्ही बघणे सोपे झाले आहे. परंतु, इंटरनेटशिवाय देखील तुम्ही लाईव्ह टीव्ही पाहू शकता. हा हे शक्य आहे. ४जी स्पीड संपल्यानंतर किंवा स्लो झाल्यानंतर बफरिंगच्या समस्या दूर करण्याचा हा सगळ्यात सोपा उपाय आहे. एक असे डिव्हाईस आहे ज्याच्या मदतीने तुम्ही इंटरनेट शिवाय लाईव्ह टीव्ही पाहू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंगल कसं काम करतं ?


  • टीव्ही ट्यूनर डोंगल DVB-T सिग्नलवर काम करतं. 

  • टीव्ही ट्यूनर डोंगल फोनला डिरेक्ट कनेक्ट करून तुम्ही टीव्ही पाहू शकता. 

  • डोंगलमध्ये मायक्रो USB पोर्ट असतं. त्याला फोनचा चार्जर कनेक्ट होतो. 



बिल्ट-इन TV सॉफ्टवेअरच्या सहाय्याने बघा लाईव्ह टीव्ही :


  • डोंगल मध्ये बिल्ट-इन TV सॉफ्टवेअर असतं. जे देशाच्या रिजननुसार चॅनल सर्च करतं. 

  • या डिव्हाईसच्या मदतीने स्मार्टफोनवर सर्व चॅनेल फ्री मध्ये पाहू शकाल. 

  • मात्र हे डिव्हाईस फक्त अॅनरॉईड स्मार्टफोनमध्ये काम करतं.