How to clean washing machine: कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन वापरणं  नित्यनेमाचं झालं आहे बऱ्याच जणांकडे आजकाल वॉशिंग मशीनमध्येच कपडे धुणं पसंत केलं जात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बऱ्याचदा खूप मळकटलेले घाणेरडे कपडे मशीनमध्ये धुतले जातात. वापरल्यानंतर मशीन स्वच्छ न करताच बंद केली जाते आणि त्यामुळे मशीन खराब होते. बऱ्याचदा मशीनवर बुरशी चढली जाते वास येतो .अशा वेळी मशीन कशी स्वच्छ करायची  मोठा प्रश्न सर्व गृहिणींना नेहमीच सतावतो चला तर जाणून घेऊया मशीन कशी स्वच्छ करायची .. 


व्हिनेगर आणि बेकिंग सोडा (Vinegar,Baking soda)
टॉप लोड वॉशिंग मशीन (TOP LOAD WASHING MACHINE)असेल तर मशीनमधेय कपडे न घालता थोडं व्हिनेगर आणि बेकिंग सोडा एकत्र करून घाला आणि आणि काही काळ मशीन चालू करून ठेऊन द्या .या नंतर ते पाणी जाऊद्या स्वच्छ कपड्याने मशीन आतून कोरडी करून घ्या.. 
व्हिनेगरच्या वापरामुळे तुमची मशीन नव्यासारखी चमकेल . 


रबर साफ करा 
मशीनच्या आतील टॅबच्या भोवती रबर असतो तो दर महिन्याला साफ करणं खूप गरजेचं आहे .कारण कपड्यांमधील घाण जाऊन हा रबर खूप खराब होतो , जर आपण साफ केला नाही तर त्यात उवांसारखे कीटक होऊ शकतात आणि परिणामी कपडे धुताना खराब होऊ शकतात.


ऑटोमॅटिक मशीन असेल तर(AUTOMATIC MACHINE)


व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याचा मिश्रण करा मशीनच्या आत बाहेर शिंपडा आणि अर्धा तास राहूद्या ,या नंतर साफ करून घ्या . 


टीप: वरील माहिती सर्वसामान्य संदर्भातून देण्यात आली आहे झी २४ तास याची खातरजमा करत नाही.