जुन्या ५०० आणि १००० च्या नोटांंची होतेय ऑनलाईन विक्री
नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण झालं.
मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण झालं.
गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद केल्या. सरकारच्या यानिर्णयामुळे अनेक गोष्टी बदलल्या. ५०० आणि १०००च्या जुन्या नोटांना बदलण्यासाठी त्या बॅंकेत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र जुन्या नोटांचा संग्रह करणार्यांसाठी मात्र काही नोटा वेबसाईटवर उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
५०० आणि १००० च्या जुन्या नोटा इबे या वेवसाईटवर उपलब्ध आहे. मात्र त्यांची किंमत आता चांगलीच वधारली आहे.
इबेवर दुर्मिळ नोटांवर बोली लागते. त्यानुसार '786' डिजिट असणार्या नोटांवर सुमारे लाखोंची बोली लागते. ही किंमत १-३ लाखांदरम्यान असते. 'इबे' वर विकणार्या ५०० आणि १०००च्या नोटा २९९ ते १०,००० इतकी आहे. यासोबतच २०० आणि ५०० नोटांचीही बोली लागते. नव्या ५०० च्या नोटेची किंमत १२०० आहे. तर दांडी मार्च मधील ५०० ची नोट सुमारे ७ लाख रूपये आहे.
देशा-विदेशामध्ये नोट जितकी जुनी तितकी त्याची किंमत जास्त असा नियम आहे. 786 सीरियल नंबर सीरीजमधील दोन हजाराची नोट सुमारे 1.50 लाख रूपये आहे.
५०० आणि १०००च्या जुना नोटा चलनामधून काढल्या आहेत. त्यामुळे त्यांना चलनमुल्य नाही. पण तुम्ही संग्रहित काही नोटा ठेवू शकता. पण या नोटा 10 पेक्षा अधिक असल्यास तुमच्यावर कायादेशीर कारवाई होऊ शकते.