मुंबई : अंमलबजावणी संचालनालय (ED) ने चीनची कंपनी Xiaomi समूहाच्या Xiaomi टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वर विदेशी चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. ईडीने कंपनीची ५५५१.२७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवैध व्यवहारांवर कारवाई


केंद्रीय एजन्सीने ही कारवाई या वर्षी फेब्रुवारीमध्ये फर्मने केलेल्या बेकायदेशीर व्यवहारांच्या संदर्भात केली आहे. ईडीने शनिवारी सांगितले की, जप्त केलेली ५५५१.२७ कोटी रुपयांची रक्कम Xiaomi टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या बँक खात्यांमध्ये पडून आहे. ज्याने २०१४ मध्ये भारतात आपला व्यवसाय सुरू केला आणि २०१५ मध्ये येथून पैसे पाठवण्यास सुरुवात केली.


अमेरिकेतील दोन कंपन्यांचाही सहभाग 


ईडीच्या म्हणण्यानुसार, कंपनीने ५५५१.२७ कोटी रुपयांचे विदेशी चलन तीन परदेशी-आधारित संस्थांना पाठवले आहे. ज्यामध्ये शाओमी ग्रुपच्या कंपनीला रॉयल्टीच्या नावाखाली मोठी रक्कम पाठवण्यात आली आहे. रॉयल्टीच्या नावाखाली ही रक्कम त्यांच्या चिनी समूह संस्थांच्या सांगण्यावरून पाठवली गेली. त्यात अमेरिकेच्या दोन कंपन्यांचाही समावेश आहे.


ईडीने सांगितले की ही रक्कम कुठेही पाठवली गेली तरी त्याचा अंतिम फायदा शाओमी समूहाच्या घटकांना होणार होता. Xiaomi India MI च्या नावाने भारतात मोबाईल फोनचा मोठा व्यवसाय चालवत आहे.


Xiaomi India भारतातील निर्मात्यांकडून मोबाईल संच आणि संबंधित उत्पादनांचा संपूर्ण संच खरेदी करते. ED ने म्हटले आहे की Xiaomi India ने तीन परदेशी कंपन्यांना मोठी रक्कम पाठवली आहे ज्यांच्याकडून Xiaomi India ने कोणतीही सेवा घेतली नाही.


शाओमी इंडियाने या रकमेच्या व्यवहारासाठी बनावट कागदपत्रे तयार केली आणि बँकांची दिशाभूल केली असेही ईडीने म्हटले आहे. परदेशात पैसे पाठवताना, Xiaomi India ने FEMA च्या कलम 4 चे उल्लंघन आहे.