मुंबई : देशात दररोजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीचा फटका लोकांना बसत आहे. अनेक शहरांमध्ये पेट्रोल प्रति लिटर १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे लोक आता वाहनांसाठी इतर पर्यायांच्या शोधात आहेत. त्यातच आता गोव्यातील इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअप कबीरा मोबिलिटीने (Kabira Mobility's electric bike) नुकतीच KM 3000 आणि KM 4000 या बाइक बाजारात आणल्या आहेत. या बाइकला पूर्ण चार्ज केल्यावर 150 किलोमीटरपर्यंत ही बाइक धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कबीरा मोबिलिटीच्या शानदार इलेक्ट्रिक बाइक (Kabira Mobility's electric bike)
कंपनीच्या अधिकृत वेबसाईटनुसार, इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअप कबीरा मोबिलिटीने नुकतीच KM 3000 आणि KM 4000 या बाइक्स लाँच केल्या आहेत. या बाइक्सचे वैशिष्टये म्हणजे तिचा लूक आणि परफॉर्मन्स.


कबीरा KM 4000 ही सध्या भारतीय बाजारपेठेतील सर्वात वेगवान बाइक असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने यामध्ये 4kWh बॅटरी पॅक आणि 6kWh क्षमतेची बीएलडीसी इलेक्ट्रिक मोटर वापरली आहे.


150 किलोमीटर पर्यंत ड्राइविंग रेंज (Driving range up to 150 km)
ही बाइक पूर्ण चार्ज केल्यावर दोन राइडींग मोडमध्ये 150 किलोमीटरपर्यंत धावू शकते, तर स्पोर्ट मोडमध्ये ९० किलोमीटरपर्यंत धावण्याची क्षमता या बाइकची आहे. त्याचा टॉप स्पीड ताशी १२० किमी आहे. मुख्य म्हणजे बाइक ३.३ सेकंदात ४० किलोमीटरचा वेग पकडू शकते.


ग्राहकांमध्ये आकर्षणचा केंद्र (Center of attraction among customers)
काबीरा मोबिलिटीच्या या बाइक बाजारात येऊन अद्याप महिनाही झालेला नाही. पण त्याची वैशिष्ट्ये, त्याचं लूक आणि त्याची स्पीड या तीन गोष्टींमुळे ती बाइक ग्राहकांमध्ये आकर्षणाचं केंद्र बनली आहे. कंपनीच्या म्हण्यानुसार, लॅान्च झाल्यानंतर अवघ्या 4 दिवसातच या दोन्ही बाइकचे बुकिंग 5 हजारांपर्यंत पोहोचली आहे आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.


बॅटरी आणि चार्जिंग (Battery and charging)
KM 3000 आणि KM 4000 या इलेक्ट्रिक बाइकना दोन मोडवर चार्ज करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. इको मोडवर, बाइकमधील पॉवर पॅक पूर्णपणे चार्ज करण्यासाठी 6 तास 30 मिनिटे लागतात. तर, बूस्ट मोडवर असताना बाइकची बॅटरी अवघ्या ५० मिनिटांत ८० टक्क्यांपर्यंत चार्ज करता येते.