हत्तीने बटाटे खाण्यासाठी रस्त्यावरची वाहतूक थांबवली
या व्हिडीओत हत्तीने रस्त्यावरचा ट्रक थांबवून त्यातून बटाटे खाण्याचा प्रयत्न केला,
मुंबई : या व्हिडीओत हत्तीने रस्त्यावरचा ट्रक थांबवून त्यातून बटाटे खाण्याचा प्रयत्न केला, यावेळी हत्तीला हटकण्यासाठी काही बारही फोडण्यात आले.
पण हत्तीला त्याचा कोणताही फरक पडला नाही, एवढंच नाही तर ट्रकमधील मालावर झाकलेली ताडपत्री काढण्याचा प्रयत्नही हत्तीने आपल्या सोंडेने केला.
यानंतर हत्तीने आपल्या सोंडेने छानपैकी ट्रकमधील बटाटे काढले आणि रस्त्यावर पसरलेले बटाटे फस्तही केले. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे. हे अजून स्पष्ट झालेलं नसलं तरी हा व्हिडीओ यूट्यूबवर ट्रेन्ड करीत आहे.