Twitter Blue Tick : अब्जाधीश उद्योगपती एलोन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून ते अनेक बदल करत आहेत. मात्र, सोशल मीडिया (social media) प्लॅटफॉर्मचा मालक म्हणून पहिल्याच आठवड्यात त्यांना अनेक मोठ्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागले आहे. असे अनेक प्रश्नही उपस्थित होऊ लागले आहेत. दरम्यान, ट्विटरवर ब्ल्यू टिकसाठी वापरकर्त्यांना मासिक शुल्क भरावे लागणार का, अशी चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता इलॉन मस्क यांनीच स्वतः यावर भाष्य केले असून Twitter यूजर्सना मोठा धक्का दिला आहे. आता ट्विटर ब्लू टिकसाठी प्रत्येक महिन्याला तुम्हाला 8 डॉलर द्यावे लागतील म्हणजेच भारतीय चलनानुसार तुम्हाला दरमहा 660 रुपये मोजावे लागणार आहे. पण यामध्ये इतर अनेक फायदे उपलब्ध करून दिली आहेत. 


जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) हे 27 ऑक्टोबर रोजी ट्विटरचे अधिग्रहण करून मालक बनले. मस्क यांनी मालकी हक्क मिळताच पहिल्याच दिवशी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह चार उच्च अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. त्याचदरम्यानस टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी ट्विटरच्या खरेदीसह एक मोठी घोषणा केली आहे. ज्यामुळे ट्विटर वापरणाऱ्या लोकांना धक्का बसला आहे. आता यूजर्सला ट्विटरवर 'ब्लू टिक' सबस्क्रिप्शनसाठी पैसे द्यावे लागतील. इलॉन मस्कच्या घोषणेनुसार ट्विटरवर 'ब्लू टिक'ची (blue Tick ) किंमत दरमहा आठ डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 660 रुपये मोजावी लागणार आहे. 


एलोन मस्क यांनी मंगळवारी "ट्विटर ब्लू" (Twitter Blue Tick)  ची नवीन आवृत्ती जाहीर केली. ज्यामध्ये ते ट्विटरच्या सदस्यता सेवेसाठी दरमहा $8 आकारत आहेत. ट्विटर पोस्टला उत्तर देणे, उल्लेख करणे आणि शोधणे याला प्राधान्य दिले जाते.


वाचा : कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ, पाहा महाराष्ट्रातील पेट्रोल, डिझेल महागले की स्वस्त झाले? 


पेड ब्लू टिकला वापरकर्ते विरोध करत आहेत


इलॉन मस्कने पेड ब्लू टिकची (Paid blue Tick ) घोषणा करताच सोशल मीडियावर लोकांनी त्याचा तीव्र विरोध केला आहे. सशुल्क ब्लू टिकबाबत लोकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. जर कोणी काही चुकीचे लिहिले तर इलॉन मस्कने यूजर्सच्या ट्विटला उत्तर देताना लिहिले की आठ डॉलर्सबद्दल तुम्हाला काय वाटते? याआधी ट्विटरवर ब्लू टिकसाठी $19.99 (जवळपास 1,600 रुपये) आकारण्यात येत होते. ज्यावर लोकांनी तीव्र विरोध केला. एका यूजरने लिहिले की, असे झाले तर मी प्लॅटफॉर्म सोडेन.


ट्विटर ब्लू कधी लाँच झाला होता


Twitter Blue मागील वर्षी जूनमध्ये वापरकर्त्यांसाठी लॉन्च करण्यात आली होती, ही कंपनीची पहिली सबस्क्रिप्शन सेवा आहे जी वापरकर्त्यांना मासिक सबस्क्रिप्शन आधारावर प्रीमियम वैशिष्ट्यांचा विशेष प्रवेश देते. या सब्सक्रिप्शनसह, ट्विट एडिट करण्याची सुविधा देखील वापरकर्त्यांना देण्यात आली आहे.