Twitter Limitation: ट्विटर यूजर्सची संख्या खूप मोठी आहे. पण एलॉन मस्क यांनी ट्विटरची धुरा संभाळायला घेतल्यानंतर त्यात मोठे बदल केले. ट्विटरवर ब्लू टिकसाठी यूजर्सना पैसे मोजावे लागले,त्यानंतर यूजर्सच्या ट्विट वाचण्यावर देखील मर्यादा आणली गेली. आता ट्विटरचे यूजर्स वेगळे पर्याय शोधू लागले आहेत.  ट्विटरच्या स्पर्धक कंपन्यांनी हे हेरले असून लवकरच ट्विटरला पर्याय समोर येण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरमध्ये मोठमोठे बदल होत आहेत. या फेब्रुवारीमध्ये ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी ब्लू स्काय नावाची सोशल साइट सुरू केली. गेल्या आठवड्यात यूजर्सनी ट्विटर सोडण्यास सुरुवात केल्यामुळे साइटला नवीन साइन-अप थांबवावे लागले.  ब्लू स्कायचे नवीन साइन-अप सोमवारपासून परत सुरु झाले आहे.


फक्त इतर यूझर्सकडून इन्विटेशन कोड मिळालेले यूझर्स ब्लू स्काय साइन अप करू शकतात. आम्ही अद्याप विकास प्रक्रियेत आहोत असे ब्लू स्कायचे म्हणणे आहे. ब्लू स्कायचे स्वरूप Twitter आणि अॅप सारखेच आहे.पण त्यात  सध्या DM पाठविण्यास  सुविधा नाही. याशिवाय लोकांना त्यात व्हिडिओ अपलोड करण्याचीही परवानगी मिळत नाही.


मास्टोडॉनकडेही ट्विटरचा पर्याय म्हणून पाहिले जात होते. मस्क यांनी ट्विटरचे अधिग्रहण केल्यानंतर काही महिन्यांतच,मास्टोडॉन यूजर्सची लोकांनी ते वापरण्यास सुरुवात केली आहे. पण ते अद्याप ट्विटरची जागा घेऊ शकले नाही.


दुसरीकडे, मेटा (फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी) ट्विटर सोडणार्‍या यूजर्सना आपल्याकडे खेचण्यासाठी पावले उचलत आहे. समोर आलेल्या अहवालानुसार, मेटाकडून टेक्स्ट-आधारित अॅप थ्रेड्स किंवा 'प्रोजेक्ट 92' लवकरच रिलीज होणार आहे. हे अ‍ॅप अगदी ट्विटरसारखेच दिसेल आणि इन्स्टाग्रामवर आधीपासूनच फॉलो केलेल्या लोकांशी कनेक्ट होण्याची परवानगी यातून मिळेल, अशी माहिती समोर येत आहे.


आधीच झाला हा बदल 


ट्वीटरने ट्विट मर्यादा ठरवण्यापूर्वी एक नवीन बदल केला. नवीन बदलानुसार, यापुढे लॉग इन केल्याशिवाय ट्विट पाहता येणार नाहीत. म्हणजे तुम्हाला ट्विट पाहायचे असेल तर तुम्हाला तुमचा आयडी ट्विटरवर तयार करावा लागेल. एलोन मस्क यांनीही याला तात्पुरता  उपाय म्हटले आहे.


आमचा इतका डेटा लुटला जात आहे की सामान्य वापरकर्त्यांसाठी ही सेवा अपमानकारक होती,असे मस्क म्हणाले. याआधीही अनेकवेळा मस्क यांनी ओपन एआयसह इतर प्लॅटफॉर्मवर नाराजी व्यक्त केली होती. अनेक प्लॅटफॉर्म त्यांच्या डेटासह त्यांचे भाषिक मॉडेल प्रशिक्षित करायचे असेही ते म्हणाले. ट्विटरने थर्ड पार्टी अ‍ॅप्स आणि शोधकर्त्यांकडून अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेससाठी शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे.


ट्विटरकडून नवीन फीचर 


दरम्यान, ट्विटरने व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आणली आहे. या फीचर अंतर्गत नवीन डाउनलोड व्हिडिओचा पर्याय जोडण्यात आला आहे. म्हणजेच, ट्विटर वापरकर्ते कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅप आणि साइटच्या मदतीशिवाय थेट प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ डाउनलोड करु शकतात.  सध्या बीटा टेस्टर्सना याचा वापर करता येईल. 


अ‍ॅप संशोधक आणि ट्विटर युजर नीमा ओवजी यांनीही या फीचरची माहिती देणारा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ट्विटर व्हिडिओ डाउनलोड बटण सुरु आहे. त्यामुळे हे फीचर लवकरच आणले जाऊ शकते, असे त्यांनी लिहिले आहे.