Elon Musk fired twitter CEO Parag Agrawal : एलॉन मस्क (elon musk) यांनी गुरुवारी ट्विटर करार पूर्ण केला असून कंपनीचा ताबा मिळताच मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल (CEO Parag Agarwal) यांच्यासह व्यवस्थापनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये सीईओ पराग अग्रवाल, सीएफओ नेड सेगल, जनरल काउंसिल सीन एजेट आणि विजया गड्डे, कायदेशीर धोरण, ट्रस्ट आणि सुरक्षा प्रमुखांना काढून टाकले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कंपनीच्या कर्मचाऱ्यांचीही हकालपट्टी होणार असून त्यामुळे ट्विटरच्या सुमारे साडेसात हजार कर्मचाऱ्यांपुढे रोजगाराचे संकट उभ राहण्याची शक्यता आहे. 


ट्विटरमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार ?


मस्क यांनी द्विटरचा ताबा घेतल्यानंतर तेथील अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता वर्तवली जात होती ( Twitter Layoff ). त्यामुळे शेकडो कर्मचारी धास्तावले होते; परंतु, नोकरकपातीची कोणतीही योजना नसल्याचे मस्क यांनी स्पष्ट केल्याचे समजते. त्यामुळे कर्मचायांना मोठा दिलासा मिळाला आहे. टेस्लाच्या सीईओने यापूर्वी पुडलवर फोरमवर टीका केली होती. मस्कने त्यांच्या भेटीदरम्यान ट्विटर कर्मचार्‍यांना सांगितले की कंपनी ताब्यात घेतल्यानंतर 75 टक्के कर्मचारी कमी करण्याची त्यांची योजना नाही.


वाचा : तुम्ही पर्यटनाला जात असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी!


माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक निवेदन जारी केले की, 'ट्विटर विकत घेतल्याबद्दल इलॉन मस्क यांचे अभिनंदन. बदलाची नितांत गरज असल्याचे अनेकांनी सांगितले. मला सांगण्यात आले की माझे खाते बॅकअप घेऊन सोमवारपर्यंत सक्रिय केले जाईल.


मस्क का म्हणाले 'लेट दॅट सिंक इन'? 


मस्क यांनी द्विटरच्या मुख्यालयात जातानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमधील व्हिडीओत ते स्वतः चिनी मातीचे बेसिन हातात घेऊन जाताना दिसतात. सोबत त्यांनी लिहिले आहे की, द्विटरच्या मुख्यालयात जात आहे, लेट दॅट सिक इन.