Twitter Blue Tick: ट्विटरचा मालकी हक्क एलोन मस्क यांच्याकडे आल्यापासून रोजच नवीन घडामोडी घडत आहेत. कर्मचारी कपात ते व्हेरिफाइड अकाउंडबाबत रोजच्या रोज बातम्या येत आहेत. असं असताना ट्विटरचे सीईओ एलोन मस्क यांना व्हेरिफाइड बॅजबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मस्क यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. आता श्रेणीनुसार अकाउंट्सना वेगवेगळ्या रंगात टिक मिळणार आहे. यामध्ये सामान्य व्यक्ती, सरकारी संस्था आणि कंपन्यांचा समावेश आहे. यासाठी तीन रंगाचं सिलेक्शन करण्यात आलं आहे. सरकारी संस्थांना ग्रे टिक, कंपन्यांना गोल्ड टिक आणि सामान्य व्यक्तींना ब्लू टिक मिळणार आहे. त्याचबरोबर संघटनांना वेगळं टिक देण्याबाबत विचार केला जात आहे. त्यामुळे आता टिकवरूनच अकाउंटची ओळख होणार आहे. ट्विटरवरील फेक अकाउंट रोखण्यासाठी पाऊल उचलल्याचं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Crypto King नावाच्या ट्विटर अकाउंटवर एलोन मस्क यांना टॅग करून ब्लू टिकबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना एलोन मस्क यांनी सांगितलं की, "उशीर झाल्याबद्दल क्षमस्व, आम्ही पुढील आठवड्यात शुक्रवारी व्हेरिफाईड लाँच करत आहोत. कंपन्यांसाठी गोल्ड टिक, सरकारसाठी ग्रे टिक, व्यक्तींसाठी निळं टिक (सेलिब्रेटी किंवा नाही) आणि सर्व सत्यापित खाती चेक सक्रिय होण्यापूर्वी मॅन्युअली प्रमाणीकृत केली जातील. त्रासदायक आहे परंतु आवश्यक आहे."



 बातमी वाचा- Pravaig Defy: भारतातील 'या' कंपनीनं तयार केली 'देसी टेस्ला', 500 किमी रेंज आणि 210 प्रतितास वेग


यापूर्वी ब्लू टिकचे असे नियम होते


ट्विटरवर या ब्लू टिकचा अर्थ असा आहे की तुमचे ट्विटर अकाउंट व्हेरिफाईड आहे. म्हणजेच बनावट नाही. लोकांना अशा लोकांच्या खऱ्या अकाऊंटची माहिती व्हावी आणि बनावट अकाऊंटच्या संपर्कात येऊ नयेत म्हणून ही ब्लू टिक दिली जाते. एलोन मस्क यांनी ट्विटर घेण्याआधी ब्लू टिक फक्त सेलिब्रिटी, पत्रकार, नेते इत्यादींना मिळत होतं. आता ट्विटरवर ब्लू टिकसाठी यूजर्सला पैसे द्यावे लागतील. ट्विटर ब्लूची किंमत भारतात रु.720 असेल. तर अमेरिका आणि इतर देशांमध्ये 8 डॉलर्स इतकी किंमत असेल.