Elon Musk launches xAI: ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी स्वत:ची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी xAI लॉन्च केली आहे. याबाबत ट्विट करत त्यांनी माहिती दिली. एआयद्वारे आपण विश्वाचं खरं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो, असं एलॉन मस्क म्हणतात. xAI च्या टीमचे नेतृत्व एलॉन मस्क करणार आहे आणि या कंपनीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये यापूर्वी काम केलेले अधिकारी असतील, अशी माहिती कंपनीने दिली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एलॉन मस्क यांची नवी कंपनी xAI च्या टीममध्ये DeepMind, OpenAI, Google Research, Microsoft Research आणि Tesla यातील कर्मचारी असतील. कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये, DeepMind सह AlphaCode आणि OpenAI च्या GPT-3.5 आणि GPT-4 चॅटबॉट्ससह प्रकल्पांवर काम करणाऱ्या प्रभावी संशोधकांना घेण्याचा निर्णय मस्क यांनी घेतला आहे. एलॉन मस्क यांची घोषणा ChatGPT सारख्या AI तंत्रज्ञानाला आव्हान देणारी घोषणा असल्याचं मानलं जातंय.


एलॉन मस्क 2015 मध्ये OpenAI चे सहसंस्थापक होते. टेस्लासोबत हितसंबंधांचा संघर्ष टाळण्यासाठी 2018 मध्ये त्यांनी पद सोडलं होतं. त्यानंतर आता 5 वर्षानंतर त्यांनी पुन्हा एकदा या या क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. त्यामुळे आता एलॉन मस्क यांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येतंय. एआय म्हणजे एक पाऊस भविष्याकडे टाकणारी यंत्रणा आहे. त्यामुळे आता काही अंशी भीती देखील व्यक्त केली जात आहे.



दरम्यान, यूएसए येथे स्टेट सेक्रेटरींनी दिलेल्या माहितीनुसार, जेरेड बर्शेल यांनी मार्चमध्ये x.AI नावाचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर आता एलॉन मस्क यांनी घोषणा केल्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.