नवी दिल्ली : बंगळुरूची स्टार्ट कंपनी एमफ्लूक्स (Emflux) ने इंडियाच्या पहिली इलेक्ट्रिक सुपर बाईकवरून १४व्या ऑटो एक्स्पोमध्ये पडदा उठवला आहे. कंपनीने या बाईकचं नाव एमफ्लूक्स वन (Emflux One) ठेवलं आहे. या बाईकमध्ये सॅमसंगची ९.७ किलो व्हॅटची पावर असलेली लिथियम आयर्न बॅटरी दिली आहे. कंपनीने सांगितले की, ही जबरदस्त बाईक २०१९ मध्ये विक्रीसाठी बाजारात उपलब्ध असेल. 


टॉप स्पीड २०० किमी प्रति तास


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाईकची मोटार ७१ बीएचपीचं पॉवर जनरेट करतो. कंपनीने दावा केलाय की, ही बाईक केवळ ० ते ३ सेकंदात १०० किमी प्रति तासाच्या वेगाने धावते. तसेच कंपनीने हेही सांगितले की, या बाईकची टॉप स्पीड २०० किमी प्रति तासपर्यंतची आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही बाईक ८० किमी प्रति तासाच्या वेगाने १५० किमीपर्यंतचं अंतर पार करू शकते. 



कधी सुरू होणार प्री-ऑर्डर


या आकर्षक बाईकला पूर्णपणे एम्फ्लक्स मोटर्सने डिझाईन केलं आहे. Emflux One ही पूर्णपणे इलेक्ट्रिक सुपरबाईक आहे आणि यात ड्यूल चॅनल एबीएसचा ब्रेम्बो ब्रेक्स, सिंगल सायडेड स्विंगआर्म, ओहलिंस सस्पेंशन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचं कनेक्टेद किबोर्डसारखे हायटेक फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीकडून या बाईकची प्री-ऑर्डर जुलै २०१८ मध्ये सुरू होणार आहे. एप्रिल २०१९ मध्ये ही बाईक लोकांना दिली जाईल. 



एम्फ्लक्स टू बाईकवरही काम सुरू


एमफ्लूक्स वनची किंमत ५ ते ६ लाख रूपये दरम्यान ठेवण्याचा अंदाज आहे. बाईक आगामी काळात बंगळुरू, नवी दिल्ली आणि मुंबईतील कंपनीच्या शोरूमध्ये शोकेस केलं जाईल. ही बाईक ऑनलाईन सुद्धा विकत घेतली जाऊ शकते. या बाईकसोबतच कंपनी एम्फ्लक्स टू या बाईकवरही काम करत आहे. ही एक नेक्ड स्ट्रीट बाईक असणार आहे.