`ही` कंपनी भारतात लॉन्च करणार ५जी इंटरनेट, JIO ला देणार टक्कर
भारतामध्ये जवळपास सर्वचजण ४जी सेवा वापरण्यास सुरुवात करत आहेत
नवी दिल्ली : भारतामध्ये जवळपास सर्वचजण ४जी सेवा वापरण्यास सुरुवात करत आहेत. त्यातच आता हा स्पीड आणखीन वाढवत भारतात नवीन ५जी सेवेसाठी एरिक्सनने पूढाकार घेतला आहे.
५जी सेवेसाठी स्वीडनची टेलिकॉम कंपनी एरिक्सन (Ericssson) ने भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या एअरटेलसोबत हातमिळवणी केली आहे.
एरिक्सनचे उपाध्यक्ष आणि दक्षिण पूर्व आशियाचे मार्केट हेड यांनी सांगितले की, "आम्ही जगभरातील ३६ टेलिकॉम ऑपरेटर्ससोबत एक करार केला आहे. भारतात ५जी सेवेसाठी भारती एअरटेलसोबत भागीदारी झाली आहे".
मात्र, या भागीदारीसंदर्भात त्यांनी कुठलीही अधिक माहिती दिलेली नाहीये.
या करारानुसार, एअरटेलसोबत मिळून एरिक्सन आगामी काळात ५जी सेवा पुरवण्यासाठी प्लानिंग तयार करणार आहे. एरिक्सन यापूर्वीच एअरटेलच्या ४जी सेवेत सहयोगी आहे.
आंतरराष्ट्रीय स्रतारावर ५जी नेटवर्कची सुरुवात २०१९-२०मध्ये होण्याची अपेक्षा आहे. तर, भारतात २०१८ पर्यंत फील्ड, कंटेंट आणि अॅप्लिकेशनचं ट्रायल सुरु होईल.