मुंबई : भारतात वापरलेल्या कारची किंवा सेकेंड हँड कारची बाजारपेठही वाढत चालली आहे. मोठ्या संख्येने लोक सेकेंड हँड कार विकत घेत आहेत. यामागे प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात. अशा परिस्थीतीत तुम्ही देखील सेकेंड हँड कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला त्याचे फायदे आणि तोटे या दोन्ही गोष्टींबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्ही वापरलेली कार खरेदी करायची की नाही याचा निर्णय घेऊ शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चला सेकेंड हँड कारचे फायदे आणि तोटे जाणून घेऊ या (second hand car profits and loss).


वापरलेली कार खरेदी करण्याचे फायदे
कोणत्याही व्यक्तीसाठी घर खरेदी करण्याव्यतिरिक्त कार खरेदी करणे ही त्याची सर्वात मोठी दुसरी इच्छा असते. यासाठी लोकांना भरपूर पैसा खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत, वापरलेली कार खरेदी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी किंमतीत कार खरेदी करून तुमची गरज किंवा छंद दोन्ही पूर्ण होऊ शकतात.


यामुळे तुम्ही ईएमआयच्या ओझ्याखाली दबले जाण्याचे टाळू शकता. समजा तुम्हाला जी कार घ्यायची आहे, त्या नवीन कारची किंमत 10 लाख रुपये आहे, पण तुमच्याकडे 4 ते 5 लाख रुपये आहेत, तर तुम्हाला उर्वरित रक्कम कर्जावर घ्यावी लागेल, ज्याची परतफेड EMI द्वारे केली जाईल. त्याच वेळी, जर तुम्ही सेकेंड हँड कार 4 ते 5 लाख रुपयांना खरेदी केली, तर तुमची गरज देखील पूर्ण होईल आणि तुम्हाला कर्ज देखील घ्यावे लागणार नाही.


तुम्ही कमी किमतीत मोठी कार खरेदी करू शकता. समजा तुम्हाला एखादे वाहन आवडते ज्याची किंमत 10 लाख रुपये आहे आणि तुम्हाला हवी असलेली वैशिष्ट्ये या वाहनात उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या मॉडेलची जुनी कार खरेदी केली, तर ती तुम्हाला 10 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल आणि तुम्हाला हवे असलेले फीचर्स देखील मिळतील.


आता आपण याचे तोटे जाणून घेऊ या


वापरलेली कार खरेदी करण्याचे तोटे


वापरलेल्या कारचा सर्वात मोठा तोटा म्हणजे त्याचा मेंटेनन्स खर्च जास्त असणे. कारण, जितके कारचे पार्ट्स जुने होतात, तसा त्यांच्या मेंटेनन्सचा खर्चही वाढतो. जर तुमच्यावर ते बदलण्याची वेळ आली तर तुम्हाला तो खर्च वाढणार.


मायलेजचा प्रश्नही ऐरणीवर येतो. जर कारच्या आधीच्या मालकाने योग्य प्रकारे देखभाल केली नसेल, तर तुम्हाला कमी मायलेजची समस्या भेडसावू शकते. अशा परिस्थितीत, इंधनाचा वापर अधिक होईल आणि ते गाडी चालवण्यासाठी तुमचा खर्च अधिक वाढेल.


जुन्या कारशी संबंधित आणखी एक धोका आहे. ही कार विकणारी व्यक्ती तुमची फसवणूक देखील करु शकते. मात्र, हा धोका तुम्ही टळू शकतो. त्यामुळे शक्यतो कंपनीकडूनच सेकेंड हँड कार घ्या. तसेच जर तुम्ही बाहेरुन कार घेत असाल, तर त्याचे कागदपत्र तपासा आणि विश्वासातील एका मेकॅनिकलला घेऊ जा. तो गाडी चेक करुन त्यात असलेले प्रॉबलम्स तुम्हाला सांगेल. ज्यामुळे फसवणूकीचा धोका कमी राहातो.


जर तुम्हाला कार बाबात 1 टक्का जरी शंका असेल, तर कार विकत घेऊ नका.