नवी दिल्ली : सध्याच्या जगात घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत चहा पाजून न करता मोबाईल चार्जिंगला लावून केले जाते असे गमतीत म्हटले जाते. कारण मोबाईलची चार्जिंग ही देखील महत्त्वाची गरज बनत चालली आहे. पण झाडाने फोन चार्ज झाला तर ? हो हे शक्य आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाईल हा सर्वांच्या जिवनातील अविभाज्य भाग झाला आहे. क्षणाक्षणाचे अपडेट्स, फोन कॉल्स, चॅट्स यासाठी आपला मोबाईल चार्ज असणे गरजेचे असते. त्यामूळे मोबाईलसाठी चार्जिंग पोर्ट सापडणे मोठी गोष्ट मानली जाते. पण असेही एक ठिकाण आहे जिथे चार्जिंगसाठी झाडाची मदत होत आहे.



सायन्स आणि टेक्नोलॉजीचा पूरेपूर फायदा घेण्यात इस्रायल नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. इस्रायली तंत्रज्ञानातील काही गोष्टी जाणून घेऊया. 


इथे असेही झाड आहे जे सुर्य किरणांना विद्युत उर्जेत परावर्तित करुन उपकरणांना चार्ज करणे, पाणी थंड करणे आणि वाय-फायच्या उपयोगी येते. म्हणजेच हे झाड सूर्यप्रकाशातील किरणांना रासायनिक ऊर्जा मध्ये रुपांतरीत करते.



इस्त्रायलची ही टेक्निक देशाला लाभदायक ठरली आहे. याचे सर्व श्रेय इस्त्रायली कंपनी सोलोजिकला जाते. सोलर पॉवर ट्री पर्यावरण स्नेही जागरुकता वाढवत आहे.  (Image Source: Getty Images)