तुमचं फेसबुक अकाऊंट कोणी चोरून वापरतंय का? कसं शोधायचं
आपण पासवर्ड शेअर न करताही आपलं फेसबुक अकाऊंट चोरून कोण पाहातंय किंवा कोणी वापरतंय का? हे कसं शोधायचं वापरा ही ट्रिक
मुंबई: इंटरनेट जितकं आपल्यासाठी उपयोगी आणि फायद्याचं आहे तेवढेच त्याचे तोटे देखील आहे. तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून जेवढी मैत्री आणि शेअरिंग करता येतं तेवढाच त्याचा उपयोग तुमची जासूसी किंवा त्याच्या गैरफायदा घेण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. याची साधी कल्पनाही आपल्याला नसते. अनेकदा आपलं एखादं सोशल मीडिया अकाऊंट एखादा व्यक्ती चोरून वापरत असतो.
फेसबुकचं तुमचं अकाऊंट कोण चोरून वापरतंय का? किंवा तुम्ही ते सुरू ठेवून गेला असाल तर तिथून कोणी ऑपरेट करतंय का हे तुम्हाला आता समजू शकणार आहे. यासाठी खास ट्रिक वापरून तुम्ही हे शोधून काढू शकता. जर चुकून तुमचं लॉगइन कोणी केलं असेल तर तुम्ही तुमच्या फोनमधूनही ते हटवू शकता आणि आपलं फेसबुक सिक्युअर करू शकता.
सर्वात पहिल्यांदा तुमचं फेसबुक अकाऊंट सुरू करा. डेक्टस्टॉप व्हर्जन सुरू केल्यानंतर सेटिंगमध्ये जा. तिथे गेल्यावर अनोळखी डिव्हाइस लॉगइन जेवढ्या दिसत आहेत ते सर्व लॉगइन लॉगआऊट करा.
सिक्युरिटी आणि लॉगिन्स ऑप्शनमध्ये Where you’re logged in असा एक पर्याय असतो तो निवडल्यानंतर तुमचं फेसबुक कोणत्या लोकेशनवरून सुरू आहे ते तुम्हाला दिसतं. तिथे तुम्ही नको असलेल्या डिव्हाइवरून तुमचं लॉगइन हटवा.
या चुका टाळा नाहीतर तुमचं फेसबुक होऊ शकतं हॅक
- पासवर्ड बदलत राहा, याशिवाय कठीण पासवर्ड ठेवा
- आपण दुसऱ्या कोणत्याही लॅपटॉप, फोनवर जर तुम्ही लॉगइन केलं असेल तर
-टू स्टेप व्हेरिफिकेशन जरी कटकटी वाटलं तरी सुरू ठेवा. त्यामुळे तुमचं लॉगइन कुठे होतंय याची कल्पना मिळेल. ओटीपीशिवाय कुठेही लॉगइन करता येणार नाही.
- तुमचं फेसबुक खातं कुठेही सुरू ठेवून जावू नका किंवा त्याचा पासवर्ड कोणासोबत शेअर करू नका