मुंबई : येत्या १ ऑक्टोबरचे जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून फेसबुकवर नवे अ‍ॅप लॉन्च होणार आहे. भारतासारख्या अनेक देशांमध्ये सुरक्षित रक्ताचा साठा आणि पुरवठा नसल्याने अनेक गरजवंतांना रक्तापासून दूर रहावे लागते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात रक्तदानाचे प्रमाणही गरजेपेक्षा कमी आहे.त्यामुळे अनेकांना रक्ताची गरज असल्यास व्हॉट्स अ‍ॅप किंवा फेसबुकपोस्टचा आधार घ्यावा लागतो. रुग्णांचा त्रास आणि रक्तगट शोधण्यासाठी होणारी धावपळ कमी करण्यासाठी फेसबुकवर हा नवा पर्याय खुला केला जाणार आहे. 


फेसबुकवर तुम्हांला  रक्तदाता म्हणून तुमचे नाव, रक्तगट अशी माहिती भरायची आहे. ही माहिती प्राईव्हेट ठेवली जाईल.  जेव्हा रक्ताची गरज असेल तेव्हा त्या ठिकाणच्या जवळच्या रक्तदात्याशी तुम्ही मेसेंजर, फोन किंवा व्हॉट्सद्वारा संपर्क करू शकाल. 


भारतीयांमध्ये रक्तदानाबाबत जागृती करण्यासाठी हे अ‍ॅप डिझाईन करण्यात आले आहे.