अखेर Facebook आणि Instagram झालं सुरु; अचानक सगळीकडून का झालं होत Log Out?
फेसबुक आणि इन्स्टाग्राम जगभरात डाऊन झाले होतो. अखेर हे दोन्ही App पुन्हा सुरु झाले आहेत.
Facebook Instagram Down News in Marathi: अचानक मोबाईल तसेच सर्व डिव्हाईसमधून फेसबुक Log Out झालं. सेशल एक्सपायर असा मेसेज आला. तसेच Instagram देखील फिड रिफ्रेश होत होत नव्हत्या. Facebook आणि Instagram डाऊन झाले होते. तांत्रिक अडथळा आल्याने फेसबुक आणि इन्स्टाग्राम जगभरात डाऊन झाले होते. जगभरातील कोट्यावधी युजर्सना याचा फटका बसला. अखेर रात्री 10.30 च्या सुमारास पुन्हा Facebook आणि Instagram झालं सुरु झाले.
Facebook आणि Instagram का डाऊन झाले?
रात्री साडे आठच्या सुमारास Facebook आणि Instagram डाऊन झाले. युझर्स फेसबुक आणि इन्स्टाग्राम या दोन्ही अॅपवर युझर्स आपोआप लॉग आऊट झाले. मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड असे मॅसेज आल्यानंतर फेसबुक अकाऊंट लॉगऑऊट झाले. त्यानंतर युझर्स लॉग इनही करुनही लॉग इन होत नव्हते. एरर दाखवला जात होता. असा प्रॉब्लेम मेसेंजर आणि थ्रेडमध्येही पाहायला मिळाला. जगभरातूनही अनेक युझर्सना ही समस्या आली. सुरुवातील सायबर अटॅक मुळे फेसबुक बंद झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र, तांक्षिक अडथळ्यामुळे Facebook आणि Instagram डाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे. अखेर तासाभरानंतर Facebook आणि Instagram पुन्हा सुरु झाले आहेत.
X वर मीम्सचा पाऊस
फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्यानंतर अनेकांनी सर्वप्रथम मोबाईल नेटवर्क चेक केले. यानंतर अनेकांनी X या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर क्रॉस चेकिंग केले. फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्यानंतर X वर मीम्सचा पाऊस पडला.