मुंबई : फेसबुकने आयफोन वापरणाऱ्या युजर्सना मोठा धक्का दिला आहे. एक मोठं फीचर फेसबुकवरून गायब केलं आहे. त्यामुळे युजर्स नाराज आहेत. iOS प्लॅटफोर्मवरून डार्क मोड फीचर घालवण्यात आलं आहे. त्यामुळे युजर्सनी नाराजी व्यक्त केली. कोणत्याही पूर्वमाहितीशिवाय किंवा स्पष्टीकरणाशिवाय हे निर्णय घेण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

iOS साठी फेसबुकने डार्क मोडचा पर्याय काढून टाकला आहे. सध्यातरी एखादा बग आल्याने असं झालं असावं अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र तंत्रज्ञानातील तज्ज्ञांनी हा बग असल्याचं मान्य केलं नाही. त्यामुळे असं का झालं असावं असा प्रश्न पडला आहे. 


अचानक गायब झालं डार्क मोड फीचर
डार्क मोड फीचर बंद झाल्यानंतर युजर्सनी फेसबुकवर आणि ट्वीटवर लोकांनी तक्रार केली आहे. सेटिंग मेनूमध्ये डार्क मोडचा पर्याय असतो. तो पर्यायच काढून टाकला आहे. त्यामुळे युजर्स नाराज आहे. 


अहवालानुसार फेसबुक अॅपमध्ये थेट डार्क मोड मॅन्युअली वापरण्याचा पर्याय नाही. 2019 मध्ये डार्क मोड आला होता. आता तो नसल्याने युजर्स यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. तर हा बगही असू शकतो अशी शंका काहींनी व्यक्त केली. याबाबत अॅपल किंवा फेसबुक कंपनीने अजून कोणतीही माहिती दिली नाही.