मुंबई : सोशल मीडियातील दिग्गज फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने मॅनेजमेंट टीमला केवळ अॅण्ड्रॉइड स्मार्टफोन वापरण्यास सांगितलंय. अॅपलचा संस्थापक टिम कूकने फेसबुकची निंदा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलायं. न्यू यॉर्क टाइम्सने या संदर्भातील वृत्त दिलंय.  MSNBC ला दिलेल्या मुलाखतीत टिम कुकने फेसबुकची निंदा केली होती. पण असं काही करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नव्हती.  याआधीही कुक सार्वजनिक ठिकाणी फेसबुकवर तुटून पडलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅंब्रिज अॅनालिटिका प्रकरण 'अॅपल' मध्ये झालं असतं तर तुम्ही काय केलं असतं ? असा प्रश्न कुकला विचारण्यात आला होता. त्यावर कुकने वेगळंच उत्तर दिलं.


'मी अशा स्थितीत आलोच नसतो, असं तो म्हणाला. तसेच फेसबुक युजर्सच्या डेटातून पैसे कमावतो, अॅपल असं कधी करणार नाही', हे देखील त्याने स्पष्ट केलं.


'कुकची वायफळ बडबड'


हे वक्तव्य वायफळ असल्याचे मार्क झुकरबर्गने म्हटले होते. मॅनेजमेंटला केवळ अॅण्ड्रॉईड वापरायला सांगण्यामागे हेच कारण आहे का ? की दुसरं काही आहे ? हे अद्याप स्पष्ट झालं नाहीयं. फेसबुकतर्फे याप्रकरणी कोणतं अधिकृत वक्तव्य आलं नाहीयं.


गोपनियतेबाबत कठोर 


'आम्ही युजर्सच्या वैयक्तिक आयुष्यात घुसत नाही. गोपनियता हा सर्वांचा मानवी अधिकार आणि नागरी स्वातंत्र्य असल्याचे' कुकने म्हटले होते. गोपनियतेविषयी 'अॅपल' मॅनेजमेंट नेहमीच कठोर राहिलंय. तसेच या प्रकरणातून खुल्या मंचावर त्यांच्याकडून फेसबुकची निंदा केली जातेय.


यावरून गेल्या दोन महिन्यांपासून दोन्ही कंपनीमध्ये तणावाचं वातावरण आहे. कुकचे आरोप हे खालच्या दर्जाचे असल्याचे झुकरबर्गने म्हटलं होतं.