फेसबूकवर आहेत `इतके` कोटी फेक अकाऊंट्स!
सोशल मीडिया वेबसाईट फेसबूकवर २७० मिलियन म्हणजेच २७ कोटीहून अधिक अकाऊंट फेक किंवा डुप्लिकेट आहेत.
नवी दिल्ली : सोशल मीडिया वेबसाईट फेसबूकवर २७० मिलियन म्हणजेच २७ कोटीहून अधिक अकाऊंट फेक किंवा डुप्लिकेट आहेत. कंपनीने या आकड्यांसंदर्भात खुलासा केला.
जवळपास १३ % अकाऊंट्स फेक :
फेसबूकने सांगितले की, २०१७ मध्ये २. १ अरब बिलियन मासिक यूजर्स पैकी फक्त २-३ % अकाऊंट्स फेक होते. मीडिया रिपोर्टनुसार, फेसबूकवर १२. कोटींहून अधिक लोक फेक अकाऊंटमधून शेअर झालेला, पोसत झालेला मेसेज वाचतात. मात्र ही संख्या कंपनीने जाहीर केलेल्या आकड्यांहून खूप अधिक आहे. कारण फेसबूकनुसार ही संख्या १० लाख इतकी आहे.
यापूर्वी फेसबूकने नव्या संस्थांच्या मदतीने नवीन मॉडेल सादर केला होते. या नव्या संस्था प्रीमियम न्यूज मॉडल्स टेस्ट करून मजकूर डिलिव्हर करतील. यामुळे नव्या संस्था सब्सक्राइब रिलेशनशिप, रेवन्यू आणि पब्लिशर प्राइसिंग यावर नियंत्रण ठेऊ शकतात.
लवकरच फेसबूक अमेरिका आणि युरोपमधील नव्या संस्थांशी पार्टनरशिप करून सब्सक्रिप्शन मॉडल ला स्पोर्ट करण्यासाठी आर्टिकल टेस्टिंग करेल. त्याचबरोबर इन्स्टंट आर्टिकल फीचरमध्ये paywalls ला अनुमती देऊ शकते.