मस्तच ! Facebook ने आणले Clubhouse सारखे फीचर्स, पैसे कमविण्याची मोठी संधी
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूक (Facebook) वापरकर्त्यांसाठी चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी नवनवीन कल्पना आणत आहे. त्यासाठी नवीन अपडेट्स किंवा फीचर्स देत असते.
मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूक (Facebook) वापरकर्त्यांसाठी चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी नवनवीन कल्पना आणत आहे. त्यासाठी नवीन अपडेट्स किंवा फीचर्स देत असते. त्याचवेळी पैसे कमविण्याची संधीही आणली आहे. लवकरच फेसबुकमध्ये काही नवीन Clubhouse सारखे फीचर येणार आहेत. आता कंपनीने ऑडिओ आधारित सोशल अॅप क्लबहाऊससारखे (Clubhouse) नवीन फीचर (New features) जोडले जाणार आहे. फेसबुकच्या या ऑडिओ बेस्ड फीचरला Live Audio Rooms असे नाव देण्यात आले आहे.
जाणून घ्या काय आहेत फायदे
Facebook Audio Roomsची संकल्पना क्लबहाऊसप्रमाणेच (Clubhouse) आहे, परंतु बरीच नवीन वैशिष्ट्ये देखील येथे दिसतील. उदाहरणार्थ, आपण आपले भाषण रेकॉर्ड करु शकाल आणि ते आपण कोठेही पाठवू शकतो. फेसबुकच्या लाईव्ह ऑडिओ रूममध्ये सबस्क्रिप्शन पर्यायही असेल. म्हणजेच जे वापरकर्त्यांना पाहिजे ते ते देण्यास सक्षम असतील आणि जर कोणाला प्रवेश करायचा असेल तर त्यांना त्यासाठी पैसे मोजावे लागतील.
ऑडिओचा टिक टॉक प्रमाणे वापर करु शकाल
फेसबूक ऑडिओ टिक-टॉक (Tik Tok) प्रमाणेच त्याचा वापर यूजर्स करु शकतात. फेसबुकमध्येही ऑडियो क्रिएटर्सचे फीचर दिले जाणार आहे. याच्या माध्यमातून ते पैसे कमवू शकतात. यामध्ये ऑडिओ रुपांतरण लहान भाग किंवा तुकड्यात करता येणार आहे आणि ते आपण ते ऑडिओ टिक-टॉक सारखे वापरु शकता. फेसबूकने या फीचरला साउंडबाईट (Soundbites) असे नाव दिले आहे. हे फीचर न्यूज फीडमध्येच जोडले जाईल. कंपनीने या फीचरला साउंड स्टुडियो इन योर पॉकेट म्हटले आहे.
मार्क झुकरबर्ग यांनी स्पष्ट केले की...
फेसबूकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांना ऑडिओ अधिक आवडतो. कारण असे आहे की ऑडिओसह आपण मल्टी टास्क होऊ शकतो. ऑडिओ ऐकताना आपण इतर काही काम देखील करु शकता.
हे फीचर्स सध्या प्रत्येक यूजर्ससाठी उपलब्ध होणार नाहीत. परंतु येत्या काही महिन्यांत ते सर्वांसाठी दिसू लागेल. ऑडिओ-आधारित सोशल नेटवर्किंगची क्रेझ जसजशी वाढत चालली आहे, तसतसे फेसबूकनेही यावर काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने पावले उचलली आहेत.