नवी दिल्ली : तुमचं आवडतं फेसबुक आता एक नवं फीचर घेवून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नव्या फीचरच्या माध्यमातुन तुम्ही तुमच्या मित्रांसोबतच त्यांच्याही मित्रांसोबत मैत्री करु शकणार आहात. टेक क्रंचने शुक्रवारी एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, या फीचरमुळे युजरला अनेक संभावित कनेक्शनची यादी एका क्लिकवर मिळणार आहे. फेसबुक युजर्सने 'गेट टू नो फ्रेंड्स' वर क्लिक केल्यास त्यांना ही सर्व माहिती मिळणार आहे.


या फीचरची सुविधा सध्या केवळ काही ठराविक युजर्ससाठीच उपलब्ध आहे. यामध्ये केवळ संभावित मित्रांची यादी दिली जाते. इतकेच नाही तर त्यासोबतच त्या मित्रांची आवड, त्यांच्या आवडीचे कार्यक्रम, ते कुठल्या पेजला लाईक करतात, ते कुठं राहतात आणि कुठं काम करतात याचीही माहिती मिळणार आहे.


या वर्षीच्या सुरुवातीला फेसबुकने 'डिस्कवर पीपल' नावाचं फीचर सुरु केलं होतं. हे फीचर युजर्सला ग्रुप आणि इव्हेंट्सच्या माध्यमातून नवे मित्र बनविण्यास मदत करतो.