फेसबुकचे नवे `फोटो रिव्यू` फीचर लॉन्च...
फेसबुकने आपल्या युजर्ससाठी नवीन फिचर सादर केले आहे.
नवी दिल्ली : फेसबुकने आपल्या युजर्ससाठी नवीन फिचर सादर केले आहे. या फिचरमुळे लोक सोशल नेटवर्कवर अगदी सहज आपली ओळख मॅनेज करू शकतात, असा कंपनीचा दावा आहे. फेसबुकने फेशियल रिकग्निशन फीचर 'फोटो रिव्यू' लॉन्च केले आहे. यामुळे दुसऱ्या कोणी अपलोड केलेला फोटोत तुमचा फोटो असल्यास तुम्हाला अलर्ट मिळेल.
हे फिचर कसे काम करेल ?
हे फीचर अनेबल केल्यानंतर युजर्सना नोटीफिकेशन मिळायला लागेल. जेव्हा कोणी तुमचा फोटो अपलो़ड करेल तेव्हा नोटीफिकेशन्स मिळायला सुरूवात होईल. फोटोत टॅग केले नसल्यास देखील हे फीचर काम करेल. फेसबुकचे अॅडव्हान्स AI तुम्हाला ओळखेल व तुम्हाला अलर्ट मिळेल.
प्रायव्हसीचा विचार
तुमचा फोटो पोफ्राईलमध्ये असल्यास हे फीचर काम करेल. मात्र त्यासाठी फोटो सर्वांना पाहण्याची सेटींग सुरू असायला हवा. फोटो जर सर्वांना दिसत नसल्यास हे फीचर काम करणार नाही. ही सुविधा प्रायव्हसीचा विचार करुन करण्यात आली आहे.