मुंबई : आता सोशल मीडियाचा काळ आहे. प्रत्येक जण म्हणजे अगदी सारेचजण सोशल मीडियावर अॅक्टिव असतात. अशात आपल्याला आपण दिवसाचा किती वेळ सोशल मीडियावर घालवला याचा अंदाज येत नाही. पण वेळ निघून गेल्यावर त्याची जाणीव होतं. असंच काहीसं फिचर फेसबुक घेऊन आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 यावर्षी ऑगस्टमध्ये फेसबुकने युझर्सकरता नवं फिचर आणलं आहे. यामुळे तुम्ही तुमचा किती अमूल्य वेळ सोशल साइट्सवर घालवता हे ट्रॅक करणार एक नवं फिचर तयार करण्यात आलं आहे. कंपनीने आता हे नवं फिचर सुरू केलं आहे. 


या फिचरवर युझर्सला अंदाज येईल की त्यांनी सोशल मीडिया साइट्स म्हणजे फेसबुक, इन्स्टाग्राम यांच्यावर किती वेळ घालवला आहे. Your Time on Facebook नावाचं हे फिचर असून युझर्ससाठी हे सुरू केलं आहे. 



जर तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रावर वेळ घालवत असाल तर तुम्ही या फेसबुक साइटवर लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर तुम्ही सेटिंग आणि प्रायवेसी ऑप्शनवर टॅप करा. यावर तुम्हाला योर टाइम ऑन फेसबुक नावाने ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करून तुम्हाला अंदाज येईल की तुम्ही किती वेळ घालवला आहे. 


अनेक लोकं सोशल मीडियावर खूप अवलंबून असतात. फेसबुक आणि इन्स्टाग्रामचं अॅडिक्शन झाल्याचं दिसून येतं. या अॅपमुळे तुम्ही मर्यादित काळापर्यंत येथे राहू शकता. या अॅपवर तुम्ही रिमांयडरचं एक नोटिफिकेशन देखील वापरू शकता.