सॅन फ्रान्सिस्को : फेसबूक दिवसेंदिवस अधिकाधिक युजर फ्रेंडली होण्यासाठी प्रयत्न  करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे काही ठराविक दिवसांनंतर फेसबूक सतत काही अपडेट्स करत असतात.


लवकरच तुमच्या  मित्रांना अनफॉलो किंवा अनफ्रेंड न करता त्यांच्या पोस्टपासून दूर राहणं शक्य होणार आहे. 'स्नूझ' हा नवा पर्याय फेसबूकच्या युजर्सना लवकरच खुला करण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे 'त्रासदायक' मित्र, पेज किंवा ग्रुप यांच्या पोस्ट तुम्ही  २४ तास, ७ दिवस किंवा ३० दिवस दूर ठेऊ शकणार आहात. 


'स्नूझ' ऑप्शनबाबत फेसबूक सध्या काही चाचण्या करत आहे. सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास लवकरच ही सुविधा यूजर्सना खुली करण्यात येईल. या पर्यायामुळे यूजर्सना त्यांना हवी असलेली माहिती चटकन आणि योग्यरित्या मिळायला मदत होईल अशी माहिती फेसबुकच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.