मुंबई : आजकाल फेस-टू- फेस भेटण्यापेक्षा अनेकजण फेसबूकवरच भेटतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकाल व्हर्च्युअल जगामध्येच अधिक रमणारी तरूणपिढी त्यामुळेच अनेक समस्या आणि व्यसनाच्या अधिन होत आहे.  


2018 मध्ये फेसबूक मात्र त्यांच्या युजर्ससाठी काही महत्त्वाचे बदल करण्याच्या तयारीमध्ये आहे. फेसबूकचा वापर अधिक युजर फ्रेंडली आणि सकारत्मक करण्याच्या दिशेने त्यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. 


नव्या अपडेट्सनुसार, फेसबूक युजर्सना नव्या ढंगात आणि अधिक फायदेशीर स्वरूपात पाहता येणार आहे.  


काय होणार बदल ? 


लवकरच फेसबूक युजर्सची न्यूजफीड अधिक फायदेशीर कंटेंडसाठी खुली करणार आहे. रिलेवंट कंटेंटपेक्षा 'मिनिंगफूल कंटेंट' वर फेसबूक अधिक लक्ष देणार आहे. 


नव्या बदलानुसार, युजर्सना आता कमीत कमी वेळ खर्च करून अधिकाधिक फायदेशीर कंटेंट मिळणार आहे. 


फेक न्यूजला लगाम  


फेक न्यूज, चूकीच्या बातम्या किंवा अफवा झपाट्याने पसरण्यामागे सोशलमीडिया हे एक प्रमुख कारण असतं. त्यामुळे युजर्सना फेक न्यूजपासून दूर ठेवण्यासाठी खास प्रयत्न केले जाणार आहेत. परिणामी सोशलमीडियाचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी मदत होणार आहे.