मुंबई : मेल, फेसबुक, ट्विटर आपले इतके अकाऊंट असतात की सगळ्याचा पासवर्ड लक्षात ठेवणे जिकरीचे होते. काही वेळा आपण एखादा पासवर्ड विसरतो. मग नवीन पासवर्डची मागणी करून अकाऊंट अनलॉक करतो. जवळच्या व्यक्तीला देखील पासवर्ड सांगणे काहीवेळा त्रासदायक ठरू शकते. मात्र तुमच्या या सगळ्या अडचणींवर आता उपाय सापडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुक सध्या फेस रिकग्नेशन या नव्या पर्यायाची चाचणी करत आहे. या पर्यायामुळे युजर्सना आपला चेहरा स्कॅन करून फेसबुकवर लॉगिंग करू शकता.  ‘टेकक्रंच’ने फेसबुकच्या या नव्या फीचरबद्दल माहिती दिली आहे. फेसबुकसाठी हे टेक्निक काही नवीन नाही. कारण मित्र मैत्रिणीसोबतच्या तुमच्या फोटोत त्यांची नावे फेसबुक अचूक ओळखतो. 


त्यामुळे मित्रांना टॅग करताना नावे शोधावी लागत नाही. हेच टेक्निक फेसबुकवर लॉग इन करण्यासाठी करता येईल का ? याची चाचणी सुरु आहे. हे फीचर युजर्ससाठी कधी उपलब्ध होईल याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र याबद्दल युजर्सना उत्सुकता आहे.