Viral Polkhol : तुम्ही गुगल पे (G Pay), फोन पे (Phone Pay), पेटीएम (Paytm) हे वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही वापरत असलेल्या गुगलपेला आरबीआयकडून (RBI) मान्यता नाहीये. हे आम्ही म्हणत नाहीये तर असा दावा करणारा मेसेज व्हायरल (Viral Messege) होतोय. गुगल पे बरेचजण वापरत असल्याने आम्ही या दाव्याची पोलखोल केली. मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात. (fact check viral polkhol google pay is not approved by rbi know what false what true)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दावा आहे तुम्ही वापरत असलेल्या गुगल पेला आरबीआयने लायसन्स दिलं नाहीये. झटपट पेमेंट करण्यासाठी गुगल पे बरेच जण वापरतात. पण, याच गुगल पे साठी आरबीआयने पेमेंट सिस्टिमसाठी मान्यता दिली नाहीये. हा दावा धक्कादायक असल्याने अनेकांना गुगल पे सुरक्षित नाहीये का असा सवाल पडू लागलाय. अनेकजण गुगल पे वापत असल्याने या दाव्याची पोलखोल करणं गरजेचं आहे. तुमच्या आमच्या पैशांचा विषय असल्याने याची सत्यता पडताळणं गरजेचं आहे. पण व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहा..


आरबीआयने दिल्ली हायकोर्टात गुगल पेला मान्यता दिली नसल्याचं सांगितलं. NPCI मधील अधिकृत पेमेंट सिस्टिमच्या यादीत गुगल पे नाही. पेमेंट करताना काही चूक झाल्यास त्याची तक्रारही करता येणार नाही. हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. आमच्या टीमने आरबीआयशीच संपर्क साधला. त्यावेळी या व्हायरल मेसेजमागतं काय सत्य समोर आलं पाहा.


गुगल पेला आरबीआयची मान्यता नसल्याचा दावा खोटा RBI ने मुगल पेला UPI पेमेंटसाठी मान्यता दिलीय. NPCI व्या अधिकृत पेमेंट सिस्टिमच्या यादीत गूगल पे आहे पेमेंट करताना चूक झाल्यात त्याची तक्रारही करता येते. व्हायरल होत असलेल्या दाव्यात तथ्य नाही. गुगल पेला आरबीआयची मान्यता असल्यानं आमच्या पडताळणीत समोर आलं. त्यामुळे गुगल पेला आरबीआयची मान्यता नाही हा दावा असत्य ठरला.