Most Expensive iPhone: iPhone हा त्याच्या बेस्ट फिचर्ससोबतच त्याच्या किंमतीमुळे देखील चर्चेत असतो. यामुळेच apple iphone एखादं मॉडेल लाँच झाले की चर्चा होतो त्याच्या किंमतीची. सोशल मीडियावर apple iphone च्या मीम्सचा वर्षाव होतो. किडनी विकून आयफोन खरदे.... अशा प्रकारचा मीम तर नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असतो. मात्र, apple iphone चं एक मॉडेल इतकं महाग आहे  स्वत:चीच काय मित्रांची किडनी विकली तरी हा  iPhone विकत घेता येणार नाही. या आयफोनची किंमत लाखो नाही तर कोटींमध्ये आहे. हा फोन जॅग्वार आणि बीएमडब्ल्यू कारपेक्षा जास्त महाग आहे. हा फोन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) यांच्याकडे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

FALCON SuperNova iPhone 6 असे या आयफोनच्या मॉडेलचे नाव आहे. हा जगातील Most Expensive iPhone आहे. या फोनची किंमत 390 कोटी रुपये इतकी आहे.  न्यूयॉर्क मधील कंपनी फाल्कनने 2021 मध्ये आयफोनचं सर्वात महाग मॉडेल लाँच केले होते. या फोनची लाँचिंग किंमत सुमारे 390 कोटी रुपये इतकी होती. फाल्कन कंपनीने 24 कॅरेट सोने आणि हिरे जडित असा हा महागडा फोन लाँच केला. कंपनी ठराविक कस्टमर्सना हा फोन कस्टमाईज करुन देते.


FALCON SuperNova iPhone 6 मध्ये Apple लोगोच्या खाली एक मोठा गुलाबी हिरा आहे. डायमंडचा आकारही फोनच्या सेटिंगवर आधारित  आहे. पिंक डायमंड फाल्कन सुपरनोव्हाचा हा फोन मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्याकडे आहे.


FALCON SuperNova iPhone 6 चे बेस्ट फिचर्स


  • FALCON SuperNova iPhone 6 128GB स्टोरेजसह येतो. 

  • iPhone 6 आणि iPhone 6 Plus मॉडेल अनलॉक आहेत

  • हे फोन कोणत्याही नेटवर्कला सपोर्ट करु शकतात.

  • या फोनमध्ये 4.7 इंच आणि 5.5 इंची स्क्रीन आहे.

  • 18 आणि 24 कॅरेट सोनं अशा दोन ऑप्शनमध्ये मिळतो.

  • कस्टमरच्या इच्छेनुसार रोझ गोल्ड प्रिमीयम मॉडेलही खरेदी करु शकतात.