मुंबई : अमेरिकेनंतर आता भारतातही गूगलने 'तेज' हे ऑनलाईन पेमेंट अ‍ॅप लॉन्च केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आईओएस आणि अ‍ॅन्ड्रॉईड फोनमध्ये हे अ‍ॅप मोफत डाऊनलोड करता येऊ शकते. तेज हे अ‍ॅप सार्‍या बॅंकांशी कनेक्टेड असल्याने तुम्हांला नवं खातं उघडण्याचीही गरज नाही. वापरायलाही सुकर असल्याने तेज अ‍ॅप 'पेटीएम'ला तीव्र स्पर्धा देईल असे सांगण्यात येत आहे. 


तेज अ‍ॅपची वैशिष्ट्य -: 


1) या अ‍ॅपद्वारा तुम्ही थेट बॅंक अकाऊंटमधून पैसे पाठवू शकाल. कोणत्याही इतर अकाऊंटची गरज नाही.
2) गूगल या सेवेसाठी कोणताही शुल्क आकारणार नाही. पैसे गूगलकडे नव्हे तर तुमच्या खात्यामध्येच सुरक्षित राहणार आहेत.
3) 'तेज' अ‍ॅपचा वापर करून तुम्ही इतर 'तेज' युजरलाही थेट पैसए पाठवू शकता. 
4) तेज वापरताना कोणत्याही बॅंक डिटेल्स किंवा फोन नंबर देण्याची गरज नाही. 
5) अ‍ॅप मधील QR कोड वापरूनही तुम्ही पैशांची देवाण घेवाण करू शकता.
6) महिन्याभरात जर तुम्ही २० मित्रांना तेज डाऊनलोड करण्यात यशस्वी ठरलात तर तुम्हांला  १००० रूपये मिळू शकतात. 
7) तेज अ‍ॅपमध्येही स्क्रॅच कार्ड, रेफरल रिवॉर्ड, लकी संडे लकी ड्रॉ अशा ऑफर्स मिळतील. 
8) प्रतिमहिना ५००००रूपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले तरीहीत्यावर कोणतीही फी आकारली जाणार नाही. परिणामी दुकारदारही डिजिटल पेमेंटसाठी 'तेज'चा पर्याय खुला करू शकतात.