फेरारी 812 सुपरफास्ट भारतात लॉन्च, किंमत-स्पीड ऐकूण बसेल आश्चर्याचा धक्का
जगातील सर्वाधिक वेगवान कार बनवणाऱ्या फेरारीने आपली नवी आणि लक्झरी काल भारतीय बाजारात लॉन्च केली आहे.
नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक वेगवान कार बनवणाऱ्या फेरारीने आपली नवी आणि लक्झरी काल भारतीय बाजारात लॉन्च केली आहे.
(व्हिडिओ पाहण्याासाठी खाली स्क्रोल करा)
नव्या कारचं नाव फेरारी 812 सुपरफास्ट असं आहे. फेरारी 812 सुपरफास्ट ही कार आता भारतीय बाजारपेठेत लाँन्च झाली आहे.
कारचा स्पीड आश्चर्य करणारा
ब्रँड न्यू फेरारी V12 GT ने सर्वाधिक पावरफूल F12 या कारला रिप्लेस केलं आहे. या कराची केवळ किंमतच नाही तर गाडीचा स्पीडही आश्चर्य करणारा आहे. गाडीचा स्पीड इतका आहे की, डोळे मिटताच अवघ्या सेकंदात गाडी तुमच्या डोळ्यासमोरुन गायब होईल.
7.9 सेकंदांत 200 किमी प्रति तास
फेरारी 812 सुपरफास्ट V12 इंजिनची सर्वात मोठी आणि चांगली बाब अशी आहे की, 2.9 सेकंदांत 100 किमी प्रति तासाचा स्पीड घेते. इतकचं नाही तर, हे V12 इंजिन 200 किमी प्रति तास हा स्पीड 7.9 सेकंदात पकडतो.
दिल्ली-मुंबई अवघ्या चार तासांत
V12 इंजिनचा टॉप स्पीड 340 किमी प्रति तास आहे. जर ही गाडी आपल्या पूर्ण स्पीडमध्ये चालली तर दिल्ली ते मुंबई हे अंतर अवघ्या सव्वा चार तासात गाठू शकते.
अनेक नवे फिचर्स
फेरारी 812 सुपरफास्टचं डिझाईन कंपनीच्या जुन्या कार प्रमाणेच आहे. मात्र, याच्या हेडलॅम्प्समध्ये काही बदल करण्यात आले आहेत. फेरारी 812 सुपरफास्ट मध्ये F12 च्या तुलनेत अनेक नवे फिचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने फेरारी 812 सुपरफास्टमध्ये इलेक्ट्रॉनिक साईड स्पिल कंट्रोल दिलं आहे जे ड्रायव्हिंगसाठी खूपच फायदेशीर आहे.
कारची किंमत
भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आलेल्या या कारची किंमत 5.2 कोटी रुपये आहे.
या रंगांत उपलब्ध
भारतामध्ये फेरारी 812 सुपरफास्ट या कारची स्पर्धा अॅस्टन मार्टिन DB 11 सोबत असणार आहे. भारतात फेरारी 812 सुपरफास्ट ही कार रेड, ब्लू आणि सिल्वर रंगांत उपलब्ध होणार आहे.