मुंबई : सणांचे दिवस सुरू झालेत. नवरात्री, दिवाळसण आणि मग ख्रिसमस... या दिवसांत ग्राहक नव्या गोष्टी खरेदी करण्यासाठी मुहूर्तच शोधत असतात. या दरम्यान ना केवळ ई-कॉमर्स कंपन्या तर ऑटो कंपन्याही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बंपर डिस्काऊंट ऑफर देत आहेत. जर तुम्ही कार खरेदी करायच्या विचारात असाल तर हीच तुमच्यासाठी योग्य संधी आहे. मारुति सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा आणि ह्युंडई यांसारख्या कंपन्या या सणांच्या सीझनमध्ये आपल्या कारवर भारीभक्कम डिस्काऊंट ऑफर करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातली सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुति सुझुकी आपल्या वॅगन आरवर सर्वाधिक म्हणजेच जास्तीत जास्त १ लाख रुपयांचा कॅश डिस्काऊंट देत आहे. याचं कारण म्हणजे वॅगन आरचं नवं वर्जन येत्या वर्षाच्या सुरुवातीलाच लॉन्च होणार आहे. मारुती सर्वात कमी म्हणजेच १०,००० रुपयांचा डिस्काऊंट बलेनोवर देत आहे... वॅगन आरवर मिळणाऱ्या एकूण डिस्काऊंटचा विचार करता ग्राहकांचा जास्तीत जास्त १.८५ लाखांचा फायदा होऊ शकतो. यामध्ये ८५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनसचाही समावेश आहे. कॉर्पोरेटसला मारुती डिलर्स १५,००० रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काऊंट देत आहेत.



मारुती सुझुकी ऑल्टो ८०० वर ४०,००० रुपयांचा कॅश डिस्काऊंट मिळतोय. तर या कारवर एक्सचेंज बोनस म्हणून ५०,००० रुपयांचा डिस्काऊंट मिळतोय. ऑल्टोच्या १० वर कॅश डिस्काऊंट ५०,००० रुपये आणि एक्सचेंज बोनस ६५,००० रुपये दिला जातोय. 



सेलेरियोवर ९५,००० कॅश डिस्काऊंट आणि ४०,००० रुपये एक्सचेंज बोनस मिळतोय. 



मारुती डिझायरवर ४०,००० रुपये कॅश डिस्काऊंट आणि ५०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जातोय. 


बलेनोवरही १०,००० रुपयांचा कॅश डिस्काऊंट आणि २०,००० रुपयांच्या एक्सचेंज बोनसशिवाय १५,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट दिला जातोय. 


मारुती स्विफ्टवर ३०,००० रुपये कॅश डिस्काऊंट आणि ३५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जातोय.