भारताकडून 5G कॉलची यशस्वी चाचणी; आयआयटी मद्रासने केलं परीक्षण
भारताने बुधवारी 5G कॉलची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी आयआयटी मद्रास येथे झाली.
चैन्नई : भारताने बुधवारी 5G कॉलची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी आयआयटी मद्रास येथे झाली. यावेळी उपस्थित असलेल्या केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 5G व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल केले. भारताचे हे स्वदेशी 5G तंत्रज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे.
IIT मद्रासच्या तरुण अभियंत्यांनी अश्विनी वैष्णव यांना 5G च्या विविध उप-प्रणालींच्या डिझाइनबद्दल समजावून सांगितले.
यापूर्वी, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी सांगितले की, भारताची स्वतःची 5G पायाभूत सुविधा या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत तयार होईल.