iPhone पेक्षा दमदार आणि OnePlus पेक्षा स्वस्त आहे हा स्मार्टफोन
या किंमतीत 8 जीबी रॅमसोबत येणारा हा पहिला स्मार्टफोन असू शकतो
मुंबई : अनेक महागड्या स्मार्टफोन्सला टक्कर देण्यासाठी ओप्पोचा सब-ब्रान्ड 'रियलमी' आज आपला नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करतंय. 'रियलमी 2 प्रो' हा दमदार स्मार्टफोन केवळ स्वस्तच नाही तर याचे फिचर्सही शानदार आहेत. या स्मार्टफोनची विक्री आज 12.30 वाजता फ्लिपकार्ट या शॉपिंग वेबसाईटवर सुरू होईल. या फोनच्या किंमतीचा खुलासा मात्र अद्याप करण्यात आलेला नाही.
'रियलमी 2 प्रो'चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
रियलमी 2 प्रो स्मार्टफोन 8 जीबी रॅमसहीत उपलब्ध असेल. यात स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर, अॅन्ड्रॉईड ओरियो 8.1 या ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करण्यात आलाय.
यात वॉटरड्रॉप नॉच डिझाईन आणि व्हर्टिकल ड्युएल रिअर कॅमेरा देण्यात आलाय. रियलमी 2 प्रोमध्ये जवळपास 91 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशोसोबत एक मोठी नॉच असेल. स्क्रीन साईज 6.3 असण्याची शक्यता आहे. मेटल आणि ग्लाससोबत, स्मार्टफोन डायमंड ब्लॅक फिनिशमध्ये डिझाईन करण्यात आलाय.
मीडिया रिपोर्टसनुसार, रियलमी 2 प्रोची किंमत 20,000 रुपयांहून कमी असू शकते. या किंमतीत 8 जीबी रॅमसोबत येणारा हा पहिला स्मार्टफोन असू शकतो.