फक्त 550 रूपयात मिळतोय `हा` 4G स्मार्टफोन, मोबाईल खरेदीसाठी नागरीकांची झुंबड
स्मार्टफोन विविध ऑफर्समुळे फक्त 549 रूपयात नागरीकांना मिळत आहे.
मुंबई : स्मार्टफोन बाजार आता इतका मोठा झालाय की, दररोज एक ना एक स्मार्टफोन लॉंच होत असतो. मोबाईलमधल्या या वाढत्या स्पर्धेमुळे हे फोन्स कमीत कमी किंमतीत जास्तीत जास्त फिचर्स देण्याकडे प्रत्येक कंपनीची चढाओढ असते. त्यात आता आणखीण एक स्मार्टफोन बाजारात दाखव झाला आहे. हा स्मार्टफोन विविध ऑफर्समुळे फक्त 549 रूपयात नागरीकांना मिळत आहे. त्यामुळे फोन खरेदीसाठी नागरीकांची झुंबड उडालीय.
ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक्स सेल सुरु आहे. या सेलमध्ये नोकियाचा 4G स्मार्टफोन फक्त 549 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.
ऑफर
Nokia C01 Plus Flipkart च्या अॅपवर 7,999 रुपयांच्या किंमतीला मिळत आहे आणि 15% डिस्काउंटनंतर, Flipkart वर या स्मार्टफोनची विक्री किंमत 6,799 रुपये आहे. जर तुम्ही हा फोन खरेदी करताना SBI चे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला हा स्मार्टफोन 680 रुपयांच्या झटपट सूटनंतर 6,119 रुपयांना मिळेल.
एक्सचेंज ऑफर
नोकियाचा हा 4G स्मार्टफोन 549 रुपयांना खरेदी करण्यासाठी तुम्हाला एक्सचेंज ऑफर वापरावी लागेल. तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात रु. 6,799 मध्ये सूचीबद्ध केलेला फोन खरेदी करून 6,250 रुपयांपर्यंत बचत करू शकता. तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास, तुमच्यासाठी Nokia C01 Plus ची किंमत 6,799 रुपयांवरून 549 रुपयांपर्यंत खाली येईल.
फिचर्स
2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज
Unisoc SC9863A प्रोसेसर
5.45-इंचाचा HD + IPS स्क्रीन डिस्प्ले
5MP रियर कॅमेरा आणि 2MP फ्रंट कॅमेरा
3000mAh बॅटरी
ड्युअल सिम 4G स्मार्टफोन