मुंबई : अ‍ॅपल आयफोन (Apple Iphone) सीरिज जगातील सर्वाधिक महागड्या स्मार्टफोनपैकी एक आहे. अ‍ॅपलचे प्रोडक्ट्स वापरणं स्टेट्स सिम्बॉल समजलं जातं. पण अ‍ॅपलचे मोबाईल सर्वसामांन्यांच्या आवाक्याबाहेरचे असतात. अ‍ॅपलच्या स्मार्टफोनचे फीचर, दमदार कॅमेरामुळे ते इतर स्मार्टफोनपेक्षा वेगळे ठरतात. जर तुम्ही नवा आयफोन घ्यायच्या विचारात असाल, तर हीच खरेदीची सुवर्णसंधी आहे. फिल्पकार्ट अ‍ॅपल डेस सेलमध्ये (flipkart apple days sale 2021) युझर्सना सेलमध्ये अ‍ॅपल सीरिजच्या स्मार्टफोनवर बंपर सूट मिळणार आहे. या सेलमध्ये नक्की कोणत्या स्मार्टफोनवर किती सूट मिळणार हे आपण सविस्तर पाहुयात. (flipkart apple days sale 2021 give more discount on many products) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सेलमध्ये ग्राहक आयफोन 12 आणि आयफोन 12 Mini 77 हजार 900 आणि 67 हजार 900 रुपयात खरेदी करु शकतात.  फिल्पकार्टच्या या सेलमध्ये आयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्स 1 लाख 15 हजार 900 आणि 1 लाख 35 हजार 900 रुपयात उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या सेलमध्ये तुम्हाला तुमच्याकडील आयफोनच्या जुन्या मोबाईलवरही भरघोस प्रमाणात डिस्काऊंट देण्यात येत आहे.


फिल्पकार्ट अ‍ॅपल डेज सेलमध्ये  IPhone 11, IPhone 12, IPhone 12 Pro Max या आणि अन्य डिव्हाईसवर ही सूट मिळणार आहे. IPhone 11 आणि IPhone 11 Pro वर 8 ते 29 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यामुळे मूळ किंमत 49 हजार 999 आणि 74 हजार 999 रुपये इतकी झाली आहे.   


सोबतच IPhone SE आणि IPhone XR मॉडलवरही डिस्काउंट आहे. सेलमध्ये IPhone SE वर 19 तर IPhone XR वर 16 टक्के डिस्काऊंट देण्यात येत आहे. या डिस्काऊंटमुळे IPhone XR 39 हजार 999 तर  IPhone SE 31 हजार 999 रुपयांत उपलब्ध होईल. 


मॉडेल्स आणि डिस्काऊंट रेट


IPhone 12 Black, 64 जीबी - या स्मार्टफोनची मूळ किंमत ही 79 हजार 900 इतकी आहे. पण या सेलमध्ये या स्मार्टफोनवर 2 टक्के सूट देण्यात येत आहे. त्यामुळे हा IPhone 12 Black सेलमध्ये  77 हजार 900 रुपयात उपलब्ध असणार आहे.  


IPhone 12 Mini 64 GB White या स्मार्टफोनवरही 2 टक्के डिस्काऊंट आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 67 हजार 900 रुपयात खरेदी करता येईल.


IPhone 12 pro 128 GB Graphite वर 3 टक्के डिस्काऊंट देण्यात येत आहे. त्यामुळे सेलमध्ये या स्मार्टफोन  1 लाख 15 हजार 900 रुपयात घेता येणार आहे. याची मूळ किंमत ही 1 लाख 19 हजार 900 रुपये इतकी आहे.   


IPhone 12 pro Max 256 GB Pacific Blue यावर 2 टक्के सूट आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन सेलमध्ये 1 लाख 35 हजार 900 रुपयात उपलब्ध असणार आहे.  याची मूळ किंमत ही 1 लाख 39 हजार 900 रुपये इतकी आहे.  


IPhone Black 64 Gb यावर बंपर सूट आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनवर 8 टक्के बंपर डिस्काउंट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन सेलमध्ये 49 हजार 999 रुपयात खरेदी करता येऊ शकतो.


IPhone XR Red 64 Gbवर तब्बल 16 टक्के डिस्काउंट आहे. हा स्मार्टफोन 39 हजार 999 रुपयात आपला करु शकता.  


IPhone SE White 64 Gb या स्मार्टफोनवर सर्वाधिक म्हणजेच 19 टक्के इतके डिस्काऊंट आहे.  त्यामुळे हा स्मार्टफोन केवळ 31 हजार 999 मध्ये घेता येणार आहे.