Flipkart Big Billion Days Sale OPPO K10 5G Offer: ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरील सेल म्हणजे ग्राहकांसाठी पर्वणीच असते. महागड्या वस्तू, गॅझेट कमी किमतीत उपलब्ध होतात. त्यामुळे सेल लागला की लागला ऑनलाईन वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते. एखाद्या प्रोडक्टची विक्री तर काही सेंकदाच्या आत होते. असाच एक जबरदस्त सेल फ्लिपकार्टवर सुरु आहे. फ्लिकार्ट बिग बिलियन डेज सेल असं याचं नाव असून 6 ऑगस्ट 2022 पासून सुरु झाला आहे. या सेलमध्ये घरातील सामनासह इलेक्ट्रॉनिक गॅझेटवर डिस्काउंट दिलं जात आहे. या सेलमध्ये 25,999 रुपये किमतीचा OPPO K10 5G स्मार्टफोन 249 रुपयात मिळत आहे. तुम्हीही या ऑफरचा फायदा घेऊ शकता, कसं ते जाणून घ्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

OPPO K10 5G चे फीचर्स 


OPPO K10 5G मध्ये, तुम्हाला 8GB RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेज दिले आहे. OPPO K10 5G, MediaTek Dimension 810 chipset वर काम करते. या स्मार्टफोनमध्ये  6.56-inch HD + Incell LCD डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी दिली आहे. ऑडिओ जॅकसह लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये 48MP प्राथमिक सेन्सर आणि 8MP फ्रंट कॅमेरासह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.


स्वस्तात मिळवा OPPO चा 5G स्मार्टफोन


ओप्पोचा 5G स्मार्टफोन, OPPO K10 5G Flipkart वर 25,999 रुपयांच्या किंमतीला लिस्ट झाला आहे. सेलमध्ये 32% च्या डिस्काउंटनंतर हा फोन 17,499 रुपयांना मिळेल. जर तुम्ही आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्डने खरेदी केला तर तुम्हाला 500 रुपयांची सूट मिळेल, त्यानंतर तुम्ही हा फोन 16,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.


249 रुपयात स्मार्टफोन असा खरेदी कराल


तुम्ही OPPO K10 5G हा स्मार्टफोन 249 रुपयांमध्ये खरेदी करू शकता,. डीलमध्ये एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला 16,750 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. जर तुम्हाला या एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा झाला तर तुम्हाला फक्त 249 रुपये मोजावे लागतील.