फ्लिपकार्टचा उन्हाळी सेल, कमी किंमतीत स्मार्टफोन देण्याचा दावा
फ्लिपकार्टचा ग्राहकांसाठी १५ मे पासून उन्हाळी सेल
मुंबई : ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट ग्राहकांसाठी बुधवारी म्हणजे १५ मे पासून उन्हाळी सेल सुरू करणार आहे. हा सेल १९ मेपर्यंत चालू असेल. ५ दिवस चालू असणाऱ्या या उन्हाळी सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, इलेक्टॉनिक वस्तूंसोबत आणखी काही गॅझेटसवर फ्लिपकार्ट बंपर सूट ऑफर करणार आहे. या सेलमध्ये फ्लिपकार्टने खाजगी क्षेञातील बँक एचडीएफसी सोबत करार केला आहे. त्यामुळे एचडीएफसी बँकच्या क्रेडीट आणि डेबिट कार्डने खरीदी केल्यावर ग्राहकांना खूप चांगली कँशबँक मिळेल असा दावा केला जात आहे.
फ्लिपकार्टच्या उन्हाळी सेलमध्ये iPhone XR, Nokia 6.1 Plus, Nokia 5.1 Plus, Realme 2 Pro, Honor 9 Lite आणि Honor 10 सोबत अजून बऱ्याच स्मार्टफोन वर खूप मोठी सुट दिली जाणार आहे. या सेलमध्ये ५९ हजार ९०० रुपये किंमत असलेला iPhone XR ला खूप चांगल्या डिस्काऊंट मिळणार आहे.
एचडीएफसीच्या कार्डने पेमेंट केल्यास प्रत्येकी १० टक्के म्हणजे ५ हजार ९९० रुपयांची विशेष सुट मिळेल. म्हणजेच फ्लिपकार्टवर हा फोन फक्त ५३ हजार ९१० रुपयांमध्ये उपलब्ध असेल. आयफोनच्या खरेदीवर फ्लिपकार्ट एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. जुन्या फोनच्या बदल्यात १७ हजार ४५० रुपयांची अतिरिक्त सुट मिळवू शकता.
गूगलच्या स्मार्ट होम स्पीकरसाठी देखील फ्लिपकार्टवर खूप मोठी सुट देण्यात येणार आहे. गुगलच्या स्मार्ट होम स्पीकर ला ९ हजार ९९९ रुपयांच्या जागेवर ७ हजार ९९९ रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. गूगल होम मिनी स्पिकरवर पण २,००० रुपयांपर्यंतची सूट दिली जाणार आहे.
४ हजार ९९९ रुपयांचा स्पीकर, या सेलमध्ये २ हजार ९९९ रुपयांमध्ये विकत घेता येऊ शकतो. फ्लिपकार्टच्या या उन्हाळी सेलमध्ये रियलमी, ओप्पो, नोकिया, ऑनर कंपनीवर भरपूर सुट दिली जाणार आहे. फ्लिपकार्टचा दावा आहे की, स्मार्टफोन वर या वर्षीचा सर्वात मोठा सेल असणार आहे.