फ्लिपकार्टवर स्मार्टफोनच्या खरेदीवर मिळणार मोठी सवलत!
६ डिसेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत सुरु होतोय `फ्लिपकार्ट बिग शॅापिंग डे सेल`. या सेलमध्ये खुप कॅटेगरीच्या प्रोडक्टवर सवलत मिळणार आहे.
मुंबई: ६ डिसेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत सुरु होतोय 'फ्लिपकार्ट बिग शॅापिंग डे सेल'. या सेलमध्ये खुप कॅटेगरीच्या प्रोडक्टवर सवलत मिळणार आहे, पण यात स्मार्टफोनवर आकर्षक सवलत मिळणार आहे. प्लिपकार्टने एचडीएफसी बॅंके सोबत भागेदारी केली आहे. जर ग्राहक एचडीएफसीच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करत असतील तर, त्याला १० टक्के डिस्काउंट मिळणार आहे. एचडीएफसीची ही ऑफर ईएमआय माध्यमातून पेमेंट केल्यावर लागू होणार. यातील काही फोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सवर नजर टाकूया.
नोकिया ५.१ प्लस
नोकिया ५.१ प्लस स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना १ हजार रुपयांची सूट मिळणार आहे. या फोनची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. पण सेलमध्ये हा फोन ९ हजार ९९९ रुपयांना मिळणार आहे. नोकिया ५.१ प्लसमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोअरेज दिला आहे. यासोबत याफोन मध्ये हीलियो पी६० प्रोसेसर सामील आहे.
रेडमी नोट ६ प्रो
फ्लिपकार्टच्या या आनोख्या ऑफरवर दरदिवशी दुपारी १२ वाजता रेडमी नोट ६ प्रोची विक्री होणार आहे. रेडमी नोट ६ प्रो मागिल महिन्यात १३ हजार ९९९ रुपये (४ जीबी) आणि १५ हजार ९९९(६ जीबी) रुपयात लॅान्च केले होते. यात ६.२६-इंच फुल एचडी + नॉच डिस्प्ले, क्वेलकॉम स्नॅपड्रॅगन ६३६ चिपसेट आणि 64 जीबी स्टोअरेज आहे. यासह ड्युअल रीअर आणि फ्रंट कॅमेरा सेटअप आहे.
रिअलमी सी१
रिअलमीने भारतात काही दिवासांपूर्वी रिअलमी सी१ लॅान्च केला होता. या स्मार्टफोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये आहे. सेलमध्ये या स्मार्टफोनवर ५०० रुपयांची सूट मिळणार आहे.रिअल सी१ मध्ये ६.२ इंच नॉच डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ४५० चिपसेट, २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल स्टोरेज आहे.
या फोन व्यतिरिक्त, आसुस जेनफोन लाइट एल१ ६ डिसेंबर रोजी दुपारी दुपारी 4,999 रुपयांना विकला जाईल. तसेच पोको एफ १ (६ जीबी रॅम +६४ जीबी स्टोअरेज) विक्रीसाठी १९ हजार ९९९ रुपयांना असेल. एवढेच नव्हे तर रिअलमी २ला ९ हजार ४९९ रुपये आणि रिअलमी २ प्रोला १३ हजार ९९० रुपयात देण्यात येणार आहेत.