मुंबई : लोकांना ऑनलाइन शॉपिंग करायला आवडते. सध्या कोरोना काळात तर घरा बाहेर पडता येत नसल्याने बहुतेक लोकांचा कल  ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडे वळला आहे. यामुळे लोकांना कोणाच्याही संपर्कात न येता, घराबाहेर न पडता शॉपिंग करता येते. त्याचबरोबर लोकांना ऑनलाईन शॉपगवर वेगवगळे डिस्काउंट देखील मिळतात. ज्यामुळे लोकांना ते करायला आवडते. आता देखील ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म ग्राहकांना अशा काही ऑफर देतात की, लोकांच्या मनात शॉपिंगचा विचार नसला तरी लोकं  शॉपिंग करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑनलाईन प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर क्वचितच असा एखादा दिवस जातो की, ते त्यांच्या यूजर्सना कोणत्याही प्रकारची ऑफर किंवा सूट देत नाही. परंतु सध्या फ्लिपकार्ट वर मान्सून अप्लायन्सेस धमाका सेल (Monsoon Appliances Dhamaka Sale) सुरू आहे. यामध्ये तुम्हाला फ्रिज, टीव्ही आणि एसी वर आश्चर्यकारक सूट मिळत आहे.


ही विक्री उद्या म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी संपेल. यावर अशा काही ऑफर्स आहेत ज्याची माहिती तुम्हाला कदाचित नसेल, त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा काही ऑफर्सबद्दल सांगणार आहोत की, त्यामध्ये तुमचा खूपच फायदा होऊ शकतो.


ऑफर काय आहे


या सेलमध्ये तुम्हाला अनेक घरगुती उपकरणांवर 75% पर्यंत सूट मिळत आहे. तसेच, जर तुम्ही ICICI बँक कार्ड वापरत असाल, तर तुम्हाला त्यात आणखी 10% सूट मिळेल. या उत्पादनांवर ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत.


फ्रीजवर अप्रतिम सूट


जर तुम्ही रेफ्रिजरेटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही संधी सोडू नका. फ्लिपकार्टच्या या विक्रीमध्ये AC वर आश्चर्यकारक सूट दिली जात आहे. उदाहरणार्थ, Haier 320L Frost Free Double Door Bottom Mount (2 Star) Refrigerator, ज्याची मूळ किंमत 42 हजार 800 रुपये आहे. परंतु तो फ्रीज तुम्हाला या सेलमध्ये 32% ऑफरसह 28 हजार 930 रुपयात मिळत आहे.


तसेच एक्सचेंज ऑफरचा लाभ घेत असल्यास तुम्हाला 12 हजार 500 रुपयांपर्यंत अधिक सूट मिळू शकते.


हा फ्रॉस्ट-फ्री फ्रिज 20% ऊर्जा वाचवते आणि 1 वर्षाची उत्पादन हमी आणि 10-वर्षांची कॉम्प्रेसर वॉरंटीसह येते.


स्मार्ट टीव्हीवर सूट उपलब्ध


आजकाल स्मार्ट टीव्ही येऊ लागले आहेत, ज्याना वापरणे खूप सोपे झाले आहे. त्यामुळे सगळ्यांनाच आता स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा आहे. परंतु किंमत जास्त असल्यामुळे किंवा बजेट कमी असल्यामुळे ज्या लोकांना स्मार्ट टीव्ही घेणे शक्य झाले नाही. अशा लोकांसाठी ही खरोखरच उत्तम डील आहे.


टीव्ही खरेदी करायची ही योग्य वेळ आहे. फ्लिपकार्टवरील या विक्रीचा लाभ घ्या आणि आपल्या आवडीचा टीव्ही कमी किंमतीत घरी आणा. 


तुम्हाला जर Micromax 32inch HD Ready LED Smart Android TV घ्यायचा असेल तर तुम्ही तो फक्त 13 हजार 499 रुपयांना खरेदी करू शकता.


तुम्हाला या टीव्हीवर 51%सूट मिळत आहे. या टीव्हीची मूळ किंमत 27 हजार 990 रुपये आहे. हा टीव्ही Amazon प्राइम आणि डिस्ने + हॉटस्टार सारख्या प्लॅटफॉर्मला सपोर्ट करतो आणि 20W चे साउंड आउटपुट देतो.


जर तुम्ही तुमचा जुना टीव्हीच्या एक्सचेंजमध्ये टीव्ही विकत घेतलात तर, तुम्हाला 11 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकेल आणि जर तुम्हाला या एक्सचेंज ऑफरची संपूर्ण किंमत मिळाली, तर तुम्ही हा नवीन टीव्ही 2 हजार 499 रुपयांना खरेदी करू शकाल. हा टीव्ही एका वर्षाच्या वॉरंटीसह येत आहे.


या किंमतीत एसी खरेदी करा


फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये एसीवर चांगली सूटही मिळत आहे. यामध्ये Onida 1.5 Ton (5 Star) Split Dual Inverter AC वर तुम्हाला 50% डिस्काउंट मिळत आहे. या ACची मुळ किंमत 61 हजार 990 रुपये आहे, ज्यावर सूट मिळाल्यानंतर तो तुम्हाला30 हजार 990 रुपयात मिळत आहे.


हा AC 25% ऊर्जा वाचवते आणि 5 वर्षांच्या कॉम्प्रेसरची हमी आहे. तसेच हा AC स्लीप मोड आणि ऑटो रीस्टार्ट वैशिष्ट्यांसह येते. तुम्ही त्याला 1 हजार 60 रुपयांच्या ईएमआयवर देखील खरेदी करू शकता.