Flying Bike: मुंबई-पुण्यासह सर्वच शहरांमध्ये ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढती लोकसंख्या आणि वाढत्या गाड्या यामुळे ही समस्या काही लवकर सुटेल असे वाटत नाही. पण आता तुम्हाला जास्त काळजी घेण्याची गरज नाही. कारण बाजारात फ्लाइंग बाइक आली आहे. या बाईकमुळे ऑटो क्षेत्र पूर्णपणे बदलून जाणार आहे. सध्या कुठे आहे ही बाईक? काय आहेत याचे फायदे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑटो उद्योग खूप वेगाने बदलत आहे. अनेक देशी विदेशी कंपन्यांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये आपल्याला नवनवीन फिचर्स पाहायला मिळतात. लोकांची पैसे खर्च करण्याची तयारी असते पण त्यांना अपडेटेड फिचर्स असेलेले वाहन हवे असते. अशा लोकांसाठी महत्वाची अपडेट आहे. आता एक आगळीवेगळी बाईक जिनिव्हा मोटर शोमध्ये सादर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही बाईक हवेत उडते. उडत्या बाईकची संकल्पना मांडणारे हे मॉडेल आहे. ही बाईक प्रत्यक्षात हवेत उडू शकते हे समजल्यानंतर लोकांनी तोंडात बोटे टाकली. 


दरवर्षी वेगवेगळ्या देशांमध्ये बाईक/मोटार शोचे आयोजन करण्यात येते. यावेळेसकतार देशात जिनिव्हा इंटरनॅशनल मोटर शोचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अनेक उत्तमोत्तम कार आणि बाइक्स पाहायला मिळाल्या. याशिवाय इथे हवेत उडू शकणाऱ्या इलेक्ट्रिक बाईकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.


हवेत उडणारी ही बाईक इलेक्ट्रिक आहे. असे असले तरी तिला हवेत उडण्यासाठी पेट्रोलची मदत घ्यावी लागते. या बाइकवरुन तुम्ही 50 किलोमीटरपर्यंतच्या रेंजपर्यंत प्रवास करु शकता. असे असले तरी ही बाईक फक्त 10 मिनिटे हवेत उडू शकते.


लेझीरेथ नावाच्या कंपनीने या बाईकची रचना केली आहे. ही बाईक रस्ता आणि हवा अशा दोन्ही ठिकाणी चालवता येते. उडताना बाईक आपली चार चाके बाहेरून उघडते आणि हवेत उडू लागते. बाईक उडताना तिची नंबर प्लेट त मागे जाते. 


लेझीरेथ कंपनीने नुकतेच मोटर शोमध्ये या बाईकचे सादरीकरण केले. या बाईकबाबत भारतासह अनेक देशातील बाईक्सप्रेमींना उत्सुकता लागली आहे. असे असले तरी तिच्या लॉन्चिंगबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही. ही बाईक खऱ्या आयुष्यात बाजारात येते की कॉन्सेप्ट मॉडेल म्हणून गायब होईल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. 


भारतासह अनेक देशांमध्ये ट्रॅफिक ही मोठी समस्या बनली आहे. ही समस्या टाळण्यासाठी, लोकांना आता फ्लाइंग कार आणि बाइकची विचारणा करत आहेत. त्यामुळे अनेक विकसित देश इलेक्ट्रिक बाइक्सवर काम करत आहेत.


उडत्या बाईकचे योग्य मॉडेल अद्याप बाजारात विक्रीसाठी आले नाही. तरीही ते बनवण्यात अनेकांना यश आले आहे. त्यामुळे भविष्यात हवेत उडणाऱ्या इलेक्ट्रिक बाइक्स रस्त्यावरुन उडताना पाहयला मिळण्याची शक्यता आहे.