मुंबई :flying bike era: तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकत अखेर अभियंत्यांनी फ्लाइंग बाईक तयार केली. आत्तापर्यंत तुम्ही फक्त हॉलिवूड चित्रपटांमध्येच उडणारी बाईक पाहिली असेल. पण आता तुम्ही ते स्वतः चालवू शकता. या बाईकने तुम्ही जेम्स बाँड स्टाइलनेही उड्डाण करू शकता, विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला पायलट परवान्याची गरज नाही.


जगातील पहिली उडणारी बाईक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, ही जगातील पहिली उडणारी बाईक असेल आणि ती व्यावसायिक वापरासाठीही उपलब्ध झाली आहे. स्वीडिश-पोलिश फर्म जेटसनने ही फ्लाइंग बाईक बनवली आहे.


पूर्ण चार्ज केल्यानंतर 20 मिनिटांपर्यंत उड्डाण जेटसनने म्हटले की, बाईकला गेल्या ऑक्टोबरमध्ये लॉन्च करण्यात आले होते आणि आता ती वापरासाठी तयार आहे. पुढच्या वर्षीच्या आगाऊ ऑर्डर घेतल्या जात आहेत.


जेटसन वनचे वजन 86 किलो आहे आणि सुमारे दोन तासांच्या बॅटरी चार्जिंगसह 20 मिनिटांपर्यंत उडू शकते.


उडणारी बाईक पूर्णपणे इलेक्ट्रिक 


जेटसन वनची उडणारी बाईक पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे. बाईकला पायलट परवान्याची आवश्यकता नाही आणि 63mph वेगाने (साधारण 101 किमी/तास) उडू शकते. जेटसन वनला टेक ऑफ करण्यासाठी कोणत्याही धावपट्टीची आवश्यकता नाही आणि ते सहजपणे कुठेही उतरू शकते. ती खरेदी करण्यासाठी दर 15 मिनिटांनी कॉल येत आहेत. या बाईकची किंमत 68,000 पौंड म्हणजेच 68,84,487 रुपये असू शकते.


बाईकची लॅन्डिंग


 ही बाईक जॉयस्टिकने नियंत्रित केले जाते. बाईकला अद्याप शहरांमध्ये उड्डाण करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. बाईक फक्त मोकळ्या मैदानात उडवता येऊ शकते.