नवी दिल्ली : भारतात फोर्डने आपली नवी हॅचबॅक  Ford Freestyle भारतात लॉन्च केलं आहे. फोर्डने फ्रीस्टाइलचे पेट्रोल आणि डिझेल मॉडेलचे चार व्हेरिएंट्स-एंबिएंट, ट्रेंड, टाइटेनियम आणि टायटेनियम प्लस लॉंच केले आहेत. फोर्ड इंडियाने फ्रीस्टाइलमध्ये नव पेट्रोल इंजिन दिलयं. कंपनीतर्फे कारमध्ये ड्रॅगन फॅमिलीचे १.२ लीटरचे इंजिन देण्यात आलयं.  Freestyleला ५ स्पीड मॅन्युअल गियरबॉक्ससोबत बाजारात आणलयं. यामध्ये अॅटोमॅटीकच ऑप्शन नाही. नव्या क्रॉस-हॅचबॅकमध्ये १.५ लीटरचे डिझल इंजन दिलय जे फोर्ड एक्सपोर्टमध्ये दिल गेलयं.  हे इंजिन ९९ bhp पॉवर आणि २१५ Nm पीक टॉर्क जनरेट करते आणि २४.४ कि.मी प्रति लीटर एवढ मायलेज देईल असे सांगण्यात आलयं.


यांच्यात होणार स्पर्धा 


भारतामध्ये या कारची स्पर्धा मारुति सुझुकी इग्निस, टोयोटा इटिऑस क्रॉस, फिएट अवेंचुरा, हुंडई i२० एक्टिव आणि अशा अनेक कारसोबत होणार आहे. कंपनीने फोर्ड फ्रिस्टाइलची एक्स शोरुम किंमत ५.०९ लाख रुपये ठेवली आहे. तसेच याच्या टॉप मॉडेलची किंमत ७.८९ लाख रुपये असणार आहे. फोर्ड फ्रिस्टाइलच्या पेट्रोलच्या टॉप वेरिएंटची किंमत ६.९४ लाख पर्यंत जाते. तर डिझेल वेरिएटची एक्सशोरुम किमत ६.०९ लाख रुपये आहे.